आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळे सोलापूर जागेतील शाळेचे आरक्षण जैसे थे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापुरात महापालिकेची प्राथमिक शाळा करणे आवश्यक असताना, शाळेसाठी आरक्षित असलेल्या पाच एकर १२ गुंठे जागेवरील आरक्षण उठवावे, असा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे सादर केला होता. शासनाने सल्लामसलत करून नगर रचना विभागाचे मत घेऊन आरक्षण जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा अध्यादेश १९ आॅगस्ट रोजी नगरविकास खात्याचे अव्वर सचिव संजय सावजी यांनी काढला. शहरानंतर जुळे सोलापुरातील आरक्षण बदलण्याचा प्रयत्न होताना त्यास शासनाने ब्रेक लावला.

जुळे सोलापुरात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रवेशासाठी वशिला लावावा लागतो. असे असताना त्या परिसरातील प्राथमिक शाळेसाठी आरक्षण क्रमांक १५/३ ने नोंद असलेल्या जागेवरील अारक्षण उठवा म्हणून महापालिका सभागृहात शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री पाटील, नगरसेविका मोहिनी पत्की यांनी प्रस्ताव आणून ठराव पारीत केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने १६ मे २०१५ रोजी जाहीर प्रसिद्धीकरण देऊन सूचना हरकती मागवून घेतले. २८ मे ते तीन जून २०१५ दरम्यान शासनाच्या राजपत्रात सूचना हरकती मागवण्यात आल्या. कोणाची हरकत आली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ११ आॅगस्ट २०१५ रोजी टिप्पणी सभागृहापुढे ठेवली. विषय क्रमांक १७२ ठराव क्रमांक १९३ अन्वये महापालिका सभागृहात एक आॅक्टोबर २०१५ रोजी मान्यता देऊन शासनाकडे पुढील निर्णयासाठी १८ डिसेंबर २०१५ रोजी पाठवले.
मनपा आरक्षण क्रमांक १५/५ च्या आरक्षणांचा वस्तुस्थिती प्रस्ताव शासनाकडे पाठवला. शासनाने निर्णय मी पाहिला पण आमच्याकडे आदेशाची प्रत आल्यावर शासनाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी होईल. महेश क्षीरसागर, प्र. सहाय्यक नगर रचना
प्रशासनाधिकारी यांचे मत महत्त्वाचे
महापालिका शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी आपला अभिप्राय स्पष्ट दिला नाही. त्याचा फायदा झाला. परिसरात दोन प्राथमिक शाळा आहेत. सदरची आरक्षित जागा शिक्षण प्रसारक मंडळाने मागणी केली आहे, असे मत दिले.

महापालिकेने केले नागरिकांना जागृत
त्या परिसरात प्लाॅट पाडून नागरिकांना विकत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार नगर अभियंता महेश क्षीरसागर यांनी जाहीर प्रसिद्धीकरण केले व्यवहार करू नये, असा आदेश काढला.

पुतळाबाई शागालोलूची जागा : ती जागा पुतळाबाई शागालोलूच्या नावाने असून, त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणून त्यांनी मोहन पवार आणि पोतदार यांच्या सांगण्यानुसार आरक्षण बदलाची मागणी केली होती.
बातम्या आणखी आहेत...