आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थिनींनी बनवल्या त्रिमिती गणपती मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कागदी लगद्यापासून थ्रीडी गणेशमूर्तीचे प्रशिक्षण देताना श्री. लोंढे. - Divya Marathi
कागदी लगद्यापासून थ्रीडी गणेशमूर्तीचे प्रशिक्षण देताना श्री. लोंढे.
सोलापूर - थ्रीडी फोटो आजवर पाहिले आहेत आणि ऐकले आहेत. आता चक्क बाप्पाही थ्रीडीत म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे खरे आहे. स. हि. ने. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी कलाशिक्षक नाथाजी लोंढे यांच्याकडून पर्यावरणपूरक त्रिमिती गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन सुंदर त्रिमिती गणपती मूर्ती साकारल्या आहेत. वाढत्या प्रदूषणाचा भर होऊ नयेे यासाठी कलाशिक्षक लोंढे यांनी शाळेतील काही निवडक मुलींना घेऊन कागदाचा लगदा मेथ्या यांच्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रयोग केले. त्यातून हा त्रिमिती गणेश साकारला आहे. त्यातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीला पर्यावरणपूरक वेगळ्या धाटणीचे प्रयोग घरीही करता यावेत घरच्या घरी मूर्ती तयार करता यावी यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
अशी करा घरी मूर्ती
दोन किलो रद्दीचा लगदा घ्या. त्यासाठी पाव किलो मेथ्या घ्या. काही वेळ ते भिजवा. नंतर मिक्सरमधून ते मिश्रण बारीक करून घ्या. ते मिश्रण घठ्ठ होईपर्यत गव्हाच्या कणकेप्रमाणे मळून घ्यावे. तुम्ही बाजारात गेल्यानंतर जशा प्रकारचे साचे हवे तसे साचे घेऊ शकता. त्याप्रमाणे मूर्ती तयार करून घ्यावी. ती मूर्ती साच्यामध्येे साधारण ते दिवस ठेवावी. ती वाळली आहे, याची खात्री करून साच्यातून मोकळी करावी.
पर्यावरणाचे संंरक्षण होते
अशा प्रकारची मूर्ती मी पहिल्यांदाच पाहिली आहे. ती तयार केल्यानंतर मला खूप आनंद झाला. अशा प्रकारच्या गणपतीची मूर्ती तयार केल्याने पर्यावरणाचे संंरक्षण होते. मूर्ती तयार केल्याचे समाधान मिळाले आहे. ऐेश्वर्या फुलारी, विद्यार्थिनी
मुलींचा उत्साह वाढेल
विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगितले की ते त्यांच्या मनावर कायमचे बिंबते. पर्यावरणपूरक गणपती मात्र तोही वेगळ्या प्रकारे बनविला तर त्याने मुलींचा उत्साह वाढेल. म्हणून अशा प्रकारच्या मूर्तीचे सूचले. नाथाजी लोंढे, कलाशिक्षक, स.हि.ने.
असा साकारला जातो त्रिमिती बाप्पा
थ्रीडी गणपती म्हणजे तो तिन्ही दिशेने सारख्या मूर्तीचा असलेला गणपती आहे. त्याचा आकार सारखा असून त्याची वेगळ्या प्रकारच्या साच्याची तयारी करून त्यात कागदाचा लगदा मेथ्यांचे मिश्रण ओतून बाप्पा साकारला जातो. या मूर्तीला पाहिल्यानंतर सर्वच बाजूंनी तंतोतंत सारखीच दिसते. त्यामुळे तिन्ही बाजूंनी साकारलेल्या मूर्तीचा इफेक्ट हा रंगविलेल्या स्वरूपात लोभस दिसतो.