आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा आज पहिला दिवस, विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त गुरुवारी शहर परिसरातील विविध शाळांनी प्रवेशोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजिले आहेत. पताके, फुले, फुगे लावून अनेक शाळांची सजावट करण्यात आली. 
 
ग्रामीण भागात जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे गावातून जनजागृती रॅली काढून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या. गणवेश खरेदीसाठी शासनाकडून अनुदान अद्याप मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेशासाठी वाट पाहावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात येईल. 

महापालिका शिक्षण मंडळातर्फे शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात येईल. महापालिका पदाधिकारी, नगरसेवक प्रशासन अधिकारी शहरातील शाळांना भेटी देणार आहेत. 

वठारेप्रभारी 
प्राथमिक शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे ३१ मे रोजी निवृत्त झाले. उपशिक्षणाधिकारी मदारगनी मुजावर यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. मुजावर यांच्या पदभार नकोच्या विनंतीवरून पंढरपूरच्या गटशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे पदभार देण्यात आला. 
गणवेश अनुदान नाही 

सार्वत्रिकशिक्षण मोहिमेतून गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पण, अद्यापही शासनाने गणवेशाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे गणवेशाविना विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत येतील. तात्पुरत्या स्वरूपात एखादा गणवेश खरेदी करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्याचे वाटप करण्याच्या सूचना प्रभारी शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी शिक्षकांना दिल्या. 
 
बातम्या आणखी आहेत...