आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोरपडचे मांस विक्री प्रकरण, पाच दिवसांची कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घोरपडचेमांस शिजवून त्याची विक्री करणे, तीन जिवंत घोरपडी बाळगल्याप्रकरणी बाळू मलेदार (वय २८, रा. कोंचीकोरवे झोपडपट्टी, सोलापूर) यास २५ जूनपर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. 
 
अक्कलकोट रस्त्यावरील कोंचीकोरवे झोडपट्टीमध्ये घोरपडीचे मांस विक्री सुरू असल्याची माहिती, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या टीमला मिळाली. वनविभागाच्या मदतीने बुधवारी (दि. २१) रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये झोडपट्टीतील मलेदार याच्या घरामध्ये घोरपडीचे मांस शिजवल्याचे आढळले. घोरपडीच्या मटणाचे तुकडे, कातडी, हाडांचे सांगाडे सापडले. त्याचप्रमाणे तीन जिवंत घोरपडी एका पिंजऱ्यामध्ये ठेवल्या होत्या. वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांनी मलेदार यास न्यायालयापुढे हजर केले, असता २५ जूनपर्यंत चौकशीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. 
 
नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सतर्कतेमुळे शहरात वन्यजीवांच्या मांस विक्रीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले. कारहुणवी कर निमित्त मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे घोरपडीची शिकार करणाऱ्यास नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पकडले होते. तसेच, मंगळवार बाजारातील वन्यजीवांची विक्री, तस्कारीच्या अनेक घटना त्यांनी उघड केल्या आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...