आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांना थेट प्रवेश करण्चाचा आणखी एक मार्ग मिळणार आहे. चौकातील गांधी पुतळ्यापासून ते थेट फलाटावर प्रवेशाची सुविधा मिळेल. यामुळे प्रवाशांचा स्थानकात प्रवेशाचा होत असणारा द्राविडीप्राणायाम टळणार आहे. नियमित रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सोलापूर रेल्वे प्रशासन जुना माल धक्का पाडून त्या ठिकाणी एक मोठे प्रवेशद्वार बनविले जाईल. हेच प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार असेल. येथून प्रवासी थेट फलाट क्रमांक वर पोहोचतील. यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नोव्हेंबरमध्ये कामास प्रारंभ केला जाणार आहे.
जुन्या मालधक्याच्या जागेत सध्या गुड्स कार्यालय रिकामे शेड आहे. हे शेड पाडण्यात येईल. प्रवेशद्वार उभारताना प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रवाशांना येथे कॅफेटेरिया, रेल्वे आरक्षण केंद्र, चालू तिकिटाचे दोन खिडक्या, चारचाकी दुचाकीचे वाहनतळ, मोठा पोर्च, छोटीशी सुंदर बाग, वेटिंग हॉल आदी सुविधा मिळतील. २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात दुसऱ्या प्रवेशद्वारास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. सोलापूर स्थानकाच्या फलाट क्रमांक च्या विस्तारीकरणाच्या जागेवर शेड उभारला जाणार आहे. सुमारे १५० मीटर लांबीचा हा शेड असणार आहे. सप्टेंबर अखेरपासून कामास सुरुवात होईल. यासाठी सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
मोठे प्रवेशद्वार बनणार
जुना मालधक्कापाडून त्या ठिकाणी एक मोठे प्रवेशद्वार बनवले जाणार आहे. सध्या या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून प्रवेशद्वाराच्या कामास सुरुवात केली जाईल. हेच प्रवेशद्वार सोलापूर स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार असणार आहे. मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...