आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फडकणार देशातील दुसरा सर्वात मोठा तिरंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी भारतातील दुसरा सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज कोल्हापुरात 303 फुट उंचीवर मोठ्या डौलाने फडकविला जाणार आहे. हा झेंडा त्‍यानंतर कायमस्‍वरुपी प्रखर विद्युत झोतात पोलिस मुख्यालयाजवळील पोलीस गार्डनमध्ये फडकत राहणार आहे.
 
हा तिरंगा तब्बल 60 फुट रुंद आणि 90 फुट लांबीचा आहे. एकूण 5 हजार 400 चौरस फुट आकाराच्‍या या ध्वजाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्‍ट्र दिनी दुपारी 3 वाजता करण्‍यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
या कार्यक्रमास हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेता अक्षयकुमार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस महासंचालक सतीश माथुर उपस्थित राहणार आहेत. त्‍याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण असे पाच विभागांचे वाद्यवृंद या महाकाय तिरंग्याला सलामी देणार आहेत.
 
महाकाय असा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा तिरंगा 12 मिनिटांत फडकावला जाणार आहे. यावेळी ध्वज वर चढत असताना स्लो मार्च अर्थात सलामी शास्त्राप्रमाणे प्रथम महाराष्ट्र गीत, प्रियदर्शनी गीत, सारे जहाँसे अच्छा हे गीत आणि ध्वज पूर्ण स्थिरावल्यानंतर शेवटी ५२ सेकंदात राष्ट्रगीताची धून वाजविली जाणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...