आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदीध्वज मिरवणूक मार्गाची पाहणी; महापालिका, पोलिस, मानकऱ्यांचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गाची पाहणी प्रशासनाने केली. सोबत मानकरी आदी होते.
सोलापूर - सिध्देश्वर यात्रेनिमित्ताने निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक मार्गाची पाहाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. या वेळी पोलिस अधिकारी, महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह यात्रेचे मानकरी उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजता बाळीवेस परिसरातील हिरेहब्बू यांच्या निवासस्थानापासून पाहणी सुरू केली. ती दुपारी दोनपर्यंत चालली.
पथकात महापालिकेचे उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह इतर अधिकारी होते. तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे, सहाय्यक पोलिस आयुक्त महिपती इंदलकर (वाहतूक), पोलिस उपायुक्त बालासिंग रजपूत, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, सूर्यकांत पाटील, तर टेलिफोन, महावितरण, केबल ऑपरेटर्स असोसिएशनचे पदाधिकारी सोबत होते. तसेच मानकरी राजशेखर हिरेहब्बू, तम्मा मसरे, सोमनाथ मेंगाणे, योगीनाथ कुर्ले, राजशेखर वाले, संतोष मैंदर्गी, जगदीश हिरेहब्बू हेही होते.

ज्या-त्या विभागाकडे सोपवली कामे
पाहाणीत६८ लिंग प्रदक्षिणा मार्गावरील समस्यांच्या नोंदी घेतल्या. संबंधित विभागांकडे त्या-त्या कामांची जबाबदारीही सोपवण्यात अाली. समस्यांमध्ये प्रामुख्याने खड्डे केबल वायरचा समावेश होता. चंडक उद्यान येथील रस्ता, रस्त्यावरील बारीक खडी कमी करणे, शुक्रवार पेठ, थोबडे घर ते बाबा कादरी मशिद रस्त्यावरील खड्डे बुजविणे. डफरीन चौक, शिवाजी चौकातील केबल विजेच्या तारा काढणे आदी कामे सुचविण्यात आली.

सोयी-सुविधांची विनंती केली
काही महत्त्वाच्या सूचना उपाययोजनांसाठी संयुक्त पाहणी केली जाते. विविध विभागांना अपेक्षित असणाऱ्या सोयीसुविधा पुरवण्याची विनंती आम्ही केली आहे. राजशेखर हिरेहब्बू, नंदीध्वज मानकरी