आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करताय! जोडीदार निवडा विवेकीपणे, दयानंद महाविद्यालयात अंनिस, रोटरीतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेतला उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रेमविवाह किंवा पालकांनी ठरवलेल्या पद्धतीने पारंपरिक विवाह अशा दोनच पद्धती सध्या समाजात रूढ आहेत. मात्र संसार आणि सहजीवन या दोन्ही बाबी पाहता जोडीदाराची निवड विवेकी पद्धतीने केली गेली पाहिजे. यासाठी परिचयोत्तर विवाह पद्धत संयुक्तिक ठरेल. या दृष्टीने युवक युवतींनी अापल्या विचारांची दिशा ठरवली पाहिजे. 

विवेकी पद्धतीने जोडीदाराची ही निवड कशी करता येईल, या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखा रोटरी क्लब जुळे सोलापूर शाखा यांनी दयानंद महाविद्यालयात संवादशाळा घेतली. या वेळी दयानंदचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे अध्यक्षस्थानी होते. संवादशाळेत डॉ. सचिन जम्मा, डॉ. सुरेश व्यवहारे, नीशा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेल येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आरती नाईक, महेंद्र नाईक, सचिन थिटे, सतीश उगले, दीक्षा काळे यांनी संवादशाळेत विद्यार्थ्यांना चार सत्रांत मार्गदर्शन केले. मंगेश पाडगावकरांच्या 
तुमचंलग्न ठरवून झालं? 
कोवळेपण हरवून झालं? 
देणार काय? घेणार काय? 
हुंडा किती, बिंडा किती ? 
याकवितेची आठवण युवक-युवतींना झाली. प्रेमविवाहातील आकर्षण, त्यातील धोके जोडीदाराची निवड विवेकी पद्धतीने कशी करता येईल, यावर मार्गदर्शन झाले. 
 
संवादशाळेतून काही युवक युवतींनी मनातल्या प्रश्नांना वाट करून दिली. एक विद्यार्थी म्हणाला, माझा जोडीदार मी निवडला, विचारही पटतात. पण तिची जात वेगळी असेल तर मग मी कोणता निर्णय घ्यायचा? उत्तर होते, विचार जुळतात ना, आपल्याला अनुरूप जोडीदार आहे, असे तुम्हा दोघांनाही वाटते नं? मग जात मुद्दा गौण ठरतो. 

एक विद्यार्थिनी म्हणाली, पारंपरिक पद्धतीने लग्न ठरताना मी काही बोलता आई-वडील म्हणतील अशा मुलाशी लग्न करणार होते. पण आता विवेकी पद्धतीने जोडीदार निवडण्याचा पर्याय मिळतो आहे. ज्याच्या बरोबर मला आयुष्य काढायचे असेल त्याच्या संदर्भातील माझ्या अपेक्षा मी लाजता, घाबरता माझ्या आई-वडिलांसमोर स्पष्ट करू शकेन इतका विश्वास मला या संवादशाळेतून मिळाला. 
 
जोडीदार निवडण्यापूर्वी ज्याच्याबरोबर आयुष्यभर सहजीवन पार पाडायचे आहे, तो कसा वागतो, त्याचे विचार कसे आहेत? त्याला कोणते व्यसन आहे का? आपल्याला साथ देऊ शकेल काय? याची उत्तरे मिळायला हवीत. केवळ वरवरची, आर्थिक जबाबदारी पेलतो की नाही, हे पाहणे खूपच त्रोटक ठरेल. तो आयुष्यभराचे नाते निभाऊ शकेल काय? हेही पाहिले पाहिजे. 
बातम्या आणखी आहेत...