आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला, युवतींचे सुरक्षा प्रशिक्षण कागदावरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिलांच्या बाबतीत स्वसंरक्षणाचे धाेरण पोकळ असून सरकारी स्तरावर महिला युवती सुरक्षेच्या बाबतीत या यंत्रणा ढिम्म अाहेत. त्याचा महिला युवतींना उपयोग होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे कोपर्डीसारख्या घटना घडत असताना राज्यात सरकार युवती आणि महिलांच्या बाबतीत किती दक्ष आहे, हे लक्षात येते.
महापालिका महिला बालकल्याण समिती, महिला बाल विकास कार्यालय अाणि स्वयंसिद्धा उपक्रम विभागीय स्तरावर करणारे राज्य क्रीडा विभागाच्या यांच्या वतीने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील युवतींच्या सुरक्षेसाठी विशेष स्वयंसिद्धा हे स्वसंरक्षण शिकवणारे प्रशिक्षण देण्याची योजना राबवली जावी, असे आदेश अाहेत. परंतु गेल्या वर्षांपासून ही योजना बंद विभागीय स्तरावर केल्याने या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे मुलींना शासनाने देऊ करूनही केवळ उदासीनतेमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. तर शासनाच्या महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला बाल कल्याण समिती मनपा या विभागांनी युवतींना उपयुक्त अशा प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेला नाही.

केवळ जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीकडून कराटे प्रशिक्षणाचा उपक्रम घेतला जातो, तोही शाळकरी मुलींसाठी. मग महिला युवतींनी करायचे काय? त्यामुळे शासन महिला आणि युवतींच्या सुरक्षेसाठी किती कटिबद्ध आहे याचे उपरोधिक चित्र आपणाला पाहावयास मिळते.

जिल्हा परिषद आणि क्रीडा संकुल यांच्या वतीने स्वयंसिद्धा ही स्वसंरक्षण देणाऱ्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम शासनाने सुमारे वर्षे सुरू ठेवले होते. एकावेळी जिल्ह्यातील सुमारे हजार युवती आणि शाळकरी मुली याचा लाभ घेत होत्या. त्यानंतर या कार्यक्रमाचे विभाजन होऊन जिल्हा परिषदेने स्वतंत्र असे उपक्रम राबवणे सुरू केले. क्रीडा संकुलनेही या उपक्रमाचे तोंड आवळले. ते जिल्हा स्तरीय करता विभागीय स्वरूपाचे केले. त्यामुळे याचा लाभ घेणे युवतींना उपयोगाचे ठरले नाही.

शालेय स्तरावर कराटे प्रशिक्षण
^गेल्या वर्षीतालुका स्तरावर असलेल्या शाळांत कराटे प्रशिक्षण घेतले आहे. यंदाच्या वर्षीही घेऊ. तालुुक्यातील सर्वच शाळांत हा उपक्रम करण्याचे नियोजन आहे.” सुकेशिनीदेशमुख, सभापती, महिला बाल कल्याण समिती, जिल्हा परिषद

^गेल्या वर्षीवेगळे वेगळे कार्यक्रम झाले. कराटेचे प्रशिक्षण झाल्याचे माहिती नाही. यंदाच्या वर्षी मी ही गरज असणारी गाेष्ट जरूर घेईन. योगा आणि कराटे प्रशिक्षण या दोन्हीचा मिळून कार्यक्रम घेणार आहे.” सारिकासुरवसे, सभापती, महिला बाल कल्याण समिती, मनपा

प्रशिक्षण घेणार
^जिल्हापरिषद आणि जिल्हा क्रीडा संकुलच्या वतीने युवतींसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येते. गेलीे तीन वर्षे त्याची सोलापुरात अंमलबजावणी झालेली नाही. यंदाच्या वषी प्रशिक्षण घेणार आहे. त्याकरिता प्रयत्न करणार आहे.” युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी

यंदा प्रयत्न करू
^युवती महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातल्या युवतींना सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी वरिष्ठांशी बोलून प्रयत्न करेन.” धर्मपाल शाहू, महिला बाल विकास अधिकारी

युवती म्हणतात ...
^महिलांच्या समस्याघडल्या की सरकार, देश, नागरिक असे सगळेच एकावेळी जागे होतात. आम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा सुरक्षा मिळत नाही. शासकीय यंत्रणा उदासीन आहे. कुणाला कुणाचा पायपोस नाही. हे असे कलाकौशल्याचे कोर्स घेण्यापेक्षा ज्याचा उपयोग होईल, असे कोर्स करा.” वृषाली रेम्बर्सो, विद्यार्थिनी

^आजच्या युगात कधी काय घडेल सांगता येत नाही. कुणी कधी कसे वागेल याचा थांगपत्ता नाही. अशावेळी एक युवती आणि एक महिला सक्षम राहिली तर तिला याचा त्रास होणार नाही. मग समोर कुणी कसाही आला तरी त्याला थेट गाठणे सहज शक्य होईल.” विद्या शिंदे, विद्यार्थिनी

^एकवेळ आरक्षणनाही दिले तरी चालेल. आम्हाला सुरक्षा द्या. त्याचे तंत्र द्या. त्याने आम्ही आमच्या पायावर उभे राहू. कधीही कसेही संकट आले तर ते झेलू. त्याने आमच्या अंगात बळ येईल. त्यासाठी शासकीय स्तरावर यंत्रणा कार्य करणे गरजेचे आहे.” वैशाली कंदी, विद्यार्थिनी

चार हजार सक्षम
^२०१० ते १२ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुलातर्फे घेतलेल्या स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षणात एका वर्षात सुमारे हजार युवती सक्षम झाल्या. विभागीय उपक्रम झाल्यापासून मात्र याचा लाभ युवतींना मिळत नाही.'' युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी

कोपर्डीच्या घटनेने तरी जागे होऊ या
या तीन समित्या आणि दोन शासकीय कार्यालये महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहेत. परंतु सगळ्यात जास्त गरज असलेल्या स्वसंरक्षणाच्या विषयावर आजपर्यंत सातत्याने काम केले गेले नाही. लाखांत आणि कोटींत या समित्यांना निधी मिळतो. कार्यालयांनाही उपक्रमांना परवानगी असते. त्याबाबत सतर्क राहून एकही कार्यक्रम घेण्यावर सभापती अथवा अधिकाऱ्यांचा जोर नाही. त्यामुळे सक्षमीकरणाचा उद्देश ठेवून ज्या काही समित्या आणि कार्यालये थाटली आहेत त्या सगळ्यांचा उपयोग सामान्य युवतीला काय होतो आहे, असा प्रश्न युवतींसमोर उभा आहे.

‘महिला बाल विकास’चाही ठेंगा
वंचित महिलांसाठी विविध योजना लाभाच्या एक खिडकी ही देशपातळीवरील योजना आणि इतरही योजना मात्र महिलांचा विकास करणारे कार्यालय म्हणून ओळखले जाणारे हे कार्यालय. त्याकडून महिलांच्या युवतींच्या सक्षमीकरणासाठी एकही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. केवळ सोलापूर नव्हे तर या विभागाचे काम चालणाऱ्या संपूर्ण राज्यात याचा कुठेही प्रशिक्षणाचा उपक्रम झालेला नाही.

झेडपीच्या समितीचे स्वसंरक्षणाकडे दुर्लक्ष
वैयक्तिक विविध उद्योगाचे प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, आरोग्य चर्चा सत्र, पोषण आहार देणे हिमोग्लोबिनच्या गोळ्यांचे वाटप आणि इतर लाभांच्या योजनांचे उपक्रम राबवले आहेत दोन महिन्याच्या शालेय स्तरावर कराटेचे प्रशिक्षण घेतले. मात्र, महिलांच्या स्वसंरक्षणाच्या संदर्भात काहीही योजना राबविल्या नाहीत.

महापालिकेकडून काहीही नवे नाही
वतनतुम्हे पुकारे हा सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांच्या उत्तम कामासाठी त्यांचा सन्मान अाणि पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिला दिनाचा कार्यक्रम इतर वैयक्तिक लाभाच्या योजना. यात कुठेही कराटे प्रशिक्षण अथवा ज्युदो प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले गेले नाहीत अथवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या कल्पना मांडल्या नाहीत.

कलाकौशल्यावर समित्यांचा भर
मनपाच्यासमितीकडून केवळ शिलाई मशीन, विविध कलाकौशल्य शिबिरे यात रस घेतला जातो. ज्या गोष्टींची युवतींना खऱ्या अर्थाने गरज आहे अशा वास्तवातील गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या समित्या आणि कार्यालये हे त्या त्या चौकटीतच अडकून पडलेले दिसून येते. शिवाय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उदासीनता हा आहे. यातील एकाही समितीला अथवा कार्यालयाला वाटत नाही की काेपर्डीसारख्या घटना घडण्याआगोदरच का मुलींना सक्षम करू नये ? त्यामुळे त्या त्या गोष्टी केवळ चौकटीच्या बाहेर पडता केल्या जात आहेत.

सुरक्षा प्रशिक्षणास नाही प्राधान्य
शहरात महिला बाल कल्याण समिती महानगर पालिका, महिला बाल विकास कार्यालय तर जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हा तालुका स्तरावर काम करण्यासाठी समिती असूनही महिलांच्या गरजा ज्या आहेत त्यांना न्याय देणे शक्य होत नाही. कराटेचे असो की विविध प्रकारच्या स्वसंरक्षणाच्या उपक्रमाचे आयोजन करण्याचा विचार एकही यंत्रणा सातत्याने करत नाही. त्यात महिला बाल विकास कार्यालयाकडे याचे विशेष निधी नसले तरी त्यानंतर एखादा उपक्रम राबवण्याचे ठरवून ते केले तरी त्याचा उपयोग महिलांना होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...