आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापुरात उभारणार सेल्फी पाॅइंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अाठ मार्च रोजी जागतिक महिला दिन अाहे. त्या निमित्ताने सोलापुरातील संभाजी (कंबर) तलाव येथील झांशीची राणी पुतळा येथील बागेत मंगळवारी (ता. ७) सायंकाळी महिलांसाठी सेल्फी पाॅइंट उभारण्यात येणार अाहे. दैनिक दिव्य मराठीने हा उपक्रम अायोजित केला अाहे. यामुळे शहरातील महिला युवतींना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली अाहे. हा उपक्रम केवळ दुपारी चार ते सात या वेळेपुरताच असेल. 

विजापूर रोडवरील संभाजी तलाव येथील बागेत दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत हा सेल्फी पाॅइंट उभारण्यात येणार अाहे. हा उपक्रम दैनिक दिव्य मराठीतर्फे अायोजित करण्यात अाला अाहे. सोलापुरातील हा पहिलाच उपक्रम अाहे. 

त्यासाठी दैनिक दिव्य मराठी मधुरिमा क्लब, अारएनए इव्हेंटच्या राही अरसीद, ९५ माय एफएम, महापालिका उद्यान विभाग, नगरसेवक संजय कोळी यांच्यासह विविध संस्था व्यक्तींचे सहकार्य मिळाले अाहे. या उपक्रमात शहरातील सेलिब्रिटी महिलांचा सहभाग असणार अाहे. अधिकाधिक महिलांना सहभागाचे आवाहन केले आहे. 

सेल्फीसाठी अाकर्षक सेट-अप 
सेल्फी फोटो काढण्यासाठी पुतळा, बाग, तलाव बाजूनेच धावणारी रेल्वे अाहेच. या शिवाय तेथे सैराटफेम अार्चीने चालविलेली बुलेट, शहराची अोळख असणारा देखावा, महाराष्ट्रीयन फेटे, रंगी-बेरंगी छत्र्या सेल्फीसाठी अावश्यक असलेला सेट-अप उभारला जणार अाहे. महिला, युवतींनी ९९२२४१६३०७ ८८०५९८६७०० या क्रमांकावर अथवा दैनिक दिव्य मराठी कार्यालयाशी संपर्क करावा तसेच या ठिकाणी काढलेले अापले सेल्फी फोटो या व्हाॅट््सअॅप क्रमांकावर पाठवावेत. युवती महिलांनी येताना शक्यतो महाराष्ट्रीयन पेहरावात यावे, असे अावाहन दैनिक दिव्य मराठीतर्फे करण्यात अाले अाहे. 

महिला दिनाचा अनोखा उपक्रम 
मोबाइल कॅमेऱ्यातून स्वत:ची सेल्फी छबी काढण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली अाहे. या सेल्फीबरोबरच संस्मरणीय ठिकाणांनाही उजाळा मिळतो. सोलापुरातही अशी अनेक ठिकाणे अाहेत. जिथे अापण त्या सोबत अापले अविस्मरणीय फोटो काढू शकतो. असेच एक ठिकाण संभाजी तलाव परिसर हे अाहे. तलाव, बाजूलाच झांशीच्या राणीचा पुतळा छानशी बागही अाहे. विजापूर रोडवरून जाताना हा परिसर खूपच रमणीय वाटतो. अशा ठिकाणाला साक्षी ठेवून स्वत:चा सेल्फी फोटो काढण्याचा हा उपक्रम खास महिला दिनाच्या निमित्ताने अायोजित केला अाहे. या ठिकाणी काढल्या जाणाऱ्या सेल्फी फोटोंना महिला दिना दिवशीच्या (ता. मार्च) दैनिक दिव्य मराठीच्या अंकात स्थान दिले जाणार अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...