आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला अाज काढूया अानंदाने सेल्फी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’चा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जागतिक महिलादिनी ‘दिव्य मराठी’तर्फे स्त्री शक्तीच्या मनोरंजनासाठी एक तात्पुरता सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. तर चला आजचा दिवस अानंदाने सेल्फी फोटोग्राफी करीत साजरा करूया. विजापूर रोडवरील संभाजी तलाव येथील बागेत दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत हा सेल्फी पाॅइंट असेल. ‘दिव्य मराठी’ने अायोजित केलेला हा सोलापुरातील पहिलाच उपक्रम अाहे.
 
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन अाहे. त्या निमित्ताने बागेत मंगळवारी सायंकाळी चार ते सात या वेळेत महिलांसाठी हा सेल्फी पाॅइंट उभारण्यात येत अाहे. यासाठी दैनिक दिव्य मराठी, मधुरिमा क्लब, अारएनए इव्हेंट्स, ९५ माय एफएम, महापालिका उद्यान विभाग, नगरसेवक संजय कोळी यांच्यासह विविध संस्था व व्यक्तींचे सहकार्य मिळात अाहे. तसेच यात शहरातील सेलिब्रिटी महिलांचा सहभाग असणार अाहे.

टेक अ सेल्फी
सेल्फी फोटो काढण्यासाठी झाशीच्या राणीचा पुतळा, बाग, तलावाच्या बाजूने धावणारी रेल्वे यासह छत्री सेल्फी पॉइंटची प्रतिकृती, बुलेट गाड्या, विविध प्रकारच्या टोप्या, पगडी, फेटे घालण्याची सोय, पारंपरिक शस्त्रांचे दालन, विविध प्रकारच्या मॉडर्न आर्ट प्रकारातील मूर्ती, माता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आदींनी युक्त सेट-अप उभारला अाहे.
 
महिला, युवतींनी ९९२२४१६३०७ व ८८०५९८६७०० या क्रमांकावर अथवा ‘दिव्य मराठी’ कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच या ठिकाणी काढलेले अापले सेल्फी फोटो या व्हाॅट्स अॅप क्रमांकावर पाठवावेत. युवती महिलांनी येताना शक्यतो महाराष्ट्रीयन पेहरावात यावे. तसेच या
ठिकाणी काढल्या जाणाऱ्या सेल्फी फोटोंना महिलादिनी ‘दिव्य मराठी’च्या अंकात स्थान दिले जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...