आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Governmental Officer, Doctors Demand Cycles

वरिष्ठ सरकारी अधिकारी, डॉक्टरांकडून सायकलची होतेय मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोटारसायकलमुळे सायकलींचा वापर कमी झाला, असे चित्र असले तरी सायकलींचा ग्राहक मात्र बदलला आहे. पूर्वी सर्वसामान्य माणूस सायकलची मागणी करायचा. आता सरकारी अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक आणि व्यापारी त्यांची मागणी नाेंदवत आहेत. का? तर आरोग्याच्या दृष्टीने मिळालेला सल्ला. ग्राहकवर्ग बदलल्याने सायकल उत्पादक कंपन्यांनीही अनेक बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे सायकलींच्या किमती वाढल्या. साधारण साडेतीन हजारांपासून २० हजारांपर्यंत त्या उपलब्ध असल्याचे येथील वितरकांनी सांगितले.

अशा आहेत सायकली
>पायडलमारणे सोपे जाण्यासाठी दुहेरी चेन (विद्यार्थ्यांसाठी)
>पायडलच्या फेऱ्या अधिक, गती मात्र कमी (खास व्यायाम)
>अॅटलास, हर्क्युलस ग्रामीण भागातील व्यवसायासाठी खास
>छोट्या अन् हलक्या मेटलमेड सायकली (खास मुलींसाठी)

वजन घटवण्यासाठी
पूर्वी सर्वसामान्य माणसासाठी दणकट अशा सायकली बाजारात यायच्या. जसे हर्क्युलस, अॅटलास वगैरे. ‘बीएसए’ ही फॅन्सी समजली जायची. आता त्यात खूप बदल झाले. दणकटपेक्षा ‘इझी सायकलिंग’चे स्वरूप आले. प्रामुख्याने वजन घटवण्यासाठी सायकलचा वापर होतोय. श्रीकांत हिबारे, सायकल विक्रेते