आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ छायाचित्रकार विद्याचंद्र पटवा यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध छायाचित्रकार विद्याचंद्र पटवा (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता निवासस्थानी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (दि.१२) सकाळी नऊ वाजता सम्राट चौकातील घरापासून निघेल. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. छायाचित्रकार जयजित जयेश पटवा यांचे ते वडील होत.

खर्डा (ता. आळंद) येथून सोलापुरात आल्यानंतर १९५६ मध्ये त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. छायाचित्र काढण्यासाठी ते सायकलवरून शहर परिसरातील गावोगावी जात. सकाळी काढलेला फोटो सायंकाळी तातडीने देण्याची सुरवात त्यांनी केली. सोलापुरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले माजी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे छायाचित्र पटवा यांनी टिपले होते. कॅमेऱ्यासाठीचा इलेक्ट्रॉनिक फ्लॅश सर्वप्रथम त्यांनी सोलापुरात आणला. सन १९६१ मध्ये टिळक चौकातील चौसोपी वाड्यात त्यांचा स्टुडआे होता. अनेक छायाचित्रकार घडविले. त्यांना अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली. सोलापुरात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान झाला होता. वयाच्या ८० वर्षानंतरही ते स्टुडिआेच्या कामात व्यस्त असायचे.

"चित्रपटातील झगमगाट नको'
उमा मंदिरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सोलापूर आलेले प्रख्यात अभिनेते राजकपूर यांची अनेक छायाचित्रे भागवत कुटुंबीयांसमवेत पटवा यांनी काढली. राज कपूर यांचे छायाचित्र त्यांनी तातडीने काढून दिले होते. राज कपूर यांनी त्यांना ‘आर.के’ स्टुडिआेमध्ये कामास येण्याची ऑफर दिली होती. त्याच क्षणी पटवा यांनी चित्रपटातील झगमगाट मला नको. सोलापूरची सेवा करण्यास मला आवडते, असे उत्तर पटवांनी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...