आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती शिंदे यांची तुझ्यात जीव रंगला मालिका ठरली सर्वोत्कृष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म कंपनीने निर्मित केलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने तब्बल सात पुरस्कार पटकावले अाहेत. उत्कृष्ट मालिका, कलावंतांसाठीचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. त्यात ‘लागिर झालं जी’बरोबरच ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचाही पुरस्कार पटकावला आहे. 
 
निर्मितीच्या क्षेत्रात स्मृती शिंदे यांचा प्रवेश २०११ मध्ये झाला. त्यांनी सोबो फिल्म ही निर्मिती संस्था सुरू केली. बोले तो मालामाल, काही जाहिरात फिल्मस मिशन सपने नंतर अाता तुझ्यात जीव रंगला मालिकेमधून त्यांनी यश मिळवले अाहे. कथानकही अस्सल ग्रामीण ढंगातले अाहे. काहीसा विनोदी बाज, कोल्हापुरी पैलवानगिरी यांच्यामुळे ही मालिका रंजक बनली अाहे. हार्दिक जोशी (राणा) अक्षया देवधर (अंजली) या व्यक्तिरेखा चर्चेत अाहेत. वहिणी चंदा (दिप्ती सोनवणे) व्यक्तिरेखाही लक्ष वेधून घेत अाहेत. 
 
कलावंत, व्यक्तिरेखांनी पटकावली सात बक्षिसे 
‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड््सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने रविवारी पार पडला. त्यात ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिर झालं जी’ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. प्रेक्षकांच्या मतांद्वारे राज्यातील २२ शहरांमधून प्रत्यक्ष, फेसबुक, वेबसाइट, आणि मिस्ड् कॉलद्वारे कल घेण्यात अाला. त्यातून पुरस्कार विजेत्यांची निवड झाली. 
 
यांना मिळाले पुरस्कार 
‘लागिरंझालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहायक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा , सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी तर तुझ्यात जीव रंगलामधील सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार दोघांना विभागून देण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...