आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर रस्त्यावर निधीमुळे सर्व्हिस रोड रखडला, लोकांचा जातोय बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाढत्या लोकवस्तीमुळे विजापूर रस्ता वर्दळीचा परिसर बनला अाहे. विजापूर महामार्ग असल्याने येथे जड वाहनांची संख्या वाढली असून दुचाकीस्वारांना सर्व्हिस रोडसाठी जागा सोडली अाहे. रस्त्याचे काम झाले नसून प्रशासनाकडून िनधी िमळत नसल्याची सबब पुढे केली जाते. परिणामी जड वाहनाखाली चिरडून अनेकांचा बळी जात अाहे. ‘अारटीअो’, वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेला येथे वाहतुकीचे नियोजन जमलेले नाही.

मार्केट यार्ड, शांती चौक, अशोक चौक, गुरूनानक चौक, जुना होटगी नाका, पत्रकार भवन, संभाजी तलाव अाणि विजापूर रस्ता ते सोरेगाव हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातो. हा मार्ग जीवघेणा ठरतोय. रविवारी रात्री दोघांचा ट्रकने बळी घेतला असून दररोज किरकोळ अपघात ठरलेले अाहेतच. चार वर्षांपूर्वी याच महामार्गावर अपघात मालिका घडली होती. आतापर्यंत येथे पंचवीसहून अधिक विद्यार्थी युवकांचा मृत्यू झाला अाहे. या घटनांची दखल घेऊन सकाळी साडेसहा ते दुपारी दीड सायंकाळी साडेतीन ते सात यावेळेत जड वाहनांना शहरात बंदी घालण्यात अाली. रात्री सात ते सकाळी साडेसहा दुपारी दीड ते साडेतीन यावेळेतच मुभा दिली अाहे. शहराच्या बाहेर पटकन जाण्याकरता चालकांची धडपड सुरू असते. त्यामुळे वेगात चालवण्यात येतात. अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
वाहतुकीची कोंडी, पोलिसांची धावपळ
रविवारी रात्री झालेल्या ट्रक अपघातात अभय पल्ले श्रीशैल अायवळे (रा. दोघे रामलिंग नगर, विजापूर रोड) यांचा मृत्यू झाला होता. दोघांची एकत्रित अंत्ययात्रा सोमवारी दुपारी बाराच्या सुमाराला काढण्यात अाली. त्यावेळी नातेवाइकांकडून अपघाताचे घटनास्थळ पाहताना एकदम गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांची धावपळ झाली. यावेळी दोन्ही दिशेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दुभाजकातील यूटर्न कमी करा
विजापूर रस्त्यावर दोन दुभाजकांत मोठी जागा सोडली अाहे. हा यूटर्न कमी करा. शिवाय अायटीअाय पोलिस चौकीसह अन्य महत्त्वाच्या चौकांत गतिरोधक तयार करण्याची मागणी शिवाजी जाधव, सतीश मस्के, प्रवीण सोनकांबळे, श्रीकांत सुरते, दीपक बनसोडे, दत्ता नडगेरी यांनी एका निवेदनाव्दारे केली. अायटीअाय पोलिस चौकीसमोर सोमवारी काहीकाळ रास्ता रोको करून मागणीबाबत लक्ष वेधल्याचे सांगण्यात अाले. २३ मे २०११ रोजी माझे वडील भगवान मस्के यांचा मृत्यू याच चौकात झाला. दोन वर्षांपूर्वी गवळी नावाचे बहीण-भावंडांचा मृत्यू तर काल दोघांचा मृत्यू झाला. ही मालिका कधी थांबणार असा सवाल सतीश मस्के यांनी केला. गतिरोधक बसवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. अशीच मागणी गेल्या वर्षीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते मनीष गडदे करत अाहेत.
ही अपघात केंद्रे : मार्केट यार्ड, जुना बोरामणी नाका, संत तुकाराम चौक, महावीर चौक, पत्रकार भवन, संभाजी तलावजवळ रेल्वे पूल, अायटीअाय पोलिस चौकीजवळ, सैफुल, सोरेगाव
संभाजी तलाव ते सोरेगाव दरम्यान दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्यास जागा सोडली अाहे. गेल्या वर्षी अाॅक्टोबरमध्ये हा रस्ता तयार करण्याचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. पण त्यासाठी अार्थिक तरतूद अजून झालेली नाही. ‘दिव्य मराठी’ने या िवषयी डीबीमधून प्रकाश टाकला होता. प्रयत्न करू असेच अधिकारी अजून सांगताहेत.
तातडीने उपाय करा
विजापूर रस्त्यावरच्या सोसायट्यांत सुमारे दोन लाख लोकसंख्या आहे. रस्ता सुरक्षेचे उपाय केले पाहिजेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने जडवाहनांना स्वतंत्र लेन ठरवून द्यावी. दुचाकीधारकांना छोटी का होईना सर्व्हिस रोडची सुविधा द्यावी. तरच या रस्त्यावर अपघातांना कुठे तरी विराम मिळेल.” बाळासाहेबपवार, नागरिक
आय. टी. आय. पोलिस चौकीसमोर रविवारी रात्री अपघातात दोघे ठार झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दुपारी निघाली. अपघातस्थळी अंत्ययात्रा थांबवून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही वेळेसाठी दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.
गतिरोधक करणार
काही कट डिव्हायडर जोडून घेण्यात येतील. अायटीअाय, सैफुल, कोर्ट काॅलनी, सोरेगावजवळ, पत्रकार भवनजवळ अशा महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक करण्यासाठी पोलिस अायुक्तांना अाज निवेदन देणार अाहे. शिवाय रस्त्याच्या दोन्हीकडेला झालेले अतिक्रमण काढण्यासाठी मनपाला कळवण्यात येईल. एन.बी. अंकुशकर, पोलिस निरीक्षक
महिलांना जास्त त्रास
दिवसा जडवाहतुकीला बंदी असल्याने विजापूर रस्त्यावर एक ते दीड किलोमीटरपर्यंत ट्रकची रांग लागते. त्यांचा वेग वाढतो. महिला अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवत असतात. विद्यार्थी आपल्या पद्धतीने जात असतात. कुठेच गतिरोधक नसल्याने सगळेच सुसाट जात असतात. मग अपघात होणार नाही का?” शुभांगीभोसले, नागरिक
सर्व्हिस रोड अशक्य
विजापूररस्त्यावरसर्व्हिस रोड देणे शक्यच नाही. जेथे करायचा आहे तेथे काही धार्मिक स्थळे आहेत. आता एकच पर्याय आहे, शहर हद्दीतील १६ ठिकाणी गतिरोधक बसवणे. कॅटअाय बसवणे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदने दिली. पण कोणच दखल घेत नाहीत. मिलिंदभोसले, अभियंता
रामलिंग नगर, इंदिरा नगर, विजापूर नाका झोपडपट्टी, निर्मिती विहार या भागाकडे अनेकजण अायटीअाय पोलिस चौकीसमोर दुभाजक अोलांडून जातात. सोरेगावहून वाहने शहरात येतात त्यावेळी त्यांचा गोंधळ उडतो. मागील दोन वर्षांत किमान अाठ- दहा जणांचा बळी गेला. महत्त्वाचे म्हणजे या मार्गावर अायटीअाय, सोनी काॅलेज, व्हीव्हीपी, ए. जी. पाटील काॅलेज, सुयश गुरुकुल, नूमवि, मेहता प्रशाला, भारती विद्यापीठ, सेंट थाॅमस ही शैक्षणिक संकुले अाहेत. जड वाहनांना रिंगरूट मार्गाने सोडावे अथवा उड्डाणपुलाचे काम लवकर हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी अाहे.
बातम्या आणखी आहेत...