आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला केल्याने दोघा तरुणांना सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माढा तालुक्यतील वेणेगावजवळील हॉटेल अतिथी येथे बिअर प्यायल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून हॉटेलमधील वेटर सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोघा तरुणांना विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सात वर्षे सक्तजुरीची शिक्षा सुनावली. नागेश उत्तम सोनवणे (वय २९, टेंभुर्णी), बाळासाहेब प्रल्हाद बागवाले (वय ३९, टेंभुर्णी) या दोघांना शिक्षा झाली. विठ्ठल गायकवाड (वय २७, वेणेगाव) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली होती. २१ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ही घटना घडली होती.

नागेश बाळासाहेब या दोघांचे बिअर जेवणाचे बिल तेराशे रुपये झाले. जेवणात किडा असल्याचे सांगत बिल देण्याचे टाळले. नागेश याने बिअरची बाटली फोडून वेटर अरविंद यादव यांच्या पोटात खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. सात साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, जखमी, फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोघांना पन्नास हजार दंड सातवर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडापैकी चाळीस हजार रुपये जखमीला देण्याचे आदेश आहेत. सरकारतर्फे अॅड. शीतल डोके, आरोपीतर्फे पी. जी. देशमुख यांनी काम पाहिले.