आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार विषयावर रॅलीतून जनजागृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुलांमध्ये लैंगिक विषयावर जनजागृती व्हावी, होणाऱ्या लैंगिक शोषण विरोधात समाजात जागृती व्हावी यासाठी येत्या रविवारी (ता. २१) सकाळी शहरातून रॅलीचे अायोजन करण्यात अाले अाहे. या रॅलीत चार हजार विद्यार्थी,पालक विविध संस्था शासकीय विभागांचाही सहभाग असणार अाहे. येथील कॅक्टस फाउंडेशनने याचे अायोजन केले असल्याची माहिती प्रमुख संयोजक नुसरख खान पहाडे यांनी दिली.
रविवारी सकाळी अाठ वाजता जुना एम्प्लाॅयमेंट चौकातून रॅलीस सुरुवात होईल. तेथून ती डफरीन चौक, अांबेडकर पुतळा मार्गे चार पुतळा येथे पोहोचेल. तेथे समारोप कार्यक्रम होणार अाहे. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, पालक, कामगार, महाविद्यालयीन विद्यार्थी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होतील. त्यापूर्वी शहरात बाल लैंगिक शोषण विरोधात संदेश देणारे फलक या मार्गावर लावले जाणार अाहेत. तसेच, रॅलीमध्ये पथनाट्ये, नृत्य सादर होतील. त्यातून जनजागृती करणे हाच हेतू अाहे. या अभियानात पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर, महापालिका अायुक्त विजय काळम-पाटील, शिक्षण सहसंचालिका सुमन शिंदे, मनपा शिक्षण मंडळाच्या सुधा साळुंखे अादींचाही सहभाग राहणार अाहे. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, विविध संस्थांना भेटून रॅलीत सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केल्याचे नुसरत खान यांनी सांगितले.

मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी कॅक्टस फाउंडेशन काम करते अाहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच मोठ्या प्रमाणात या विषयावरील जागृती अभियान पहिल्यांदाच होत अाहे.
यात सहभागी होण्यासाठी लोकांमध्ये उत्साह दिसून येत अाहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मित्तल पटेल, मीनल पटेल, निव्या काकाणी, अर्पिता गांधी, रामेश्वर ईराबत्ती, सपना रांभिया-हैदराबादवाले हे काम पाहत अाहेत.

सोलापूरकर चुप्पी तोडो
^मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत पालक अाणि पाल्य यांच्यात संवाद होत नाही. माहिती असूनही एक वेगळे दडपण असल्याने ते एकमेकांशी बोलत नाहीत. त्यांच्यातील या विषयावरी ही चुप्पी तुटली जावी संवाद व्हावा यासाठी कॅक्टस फाउंडेशन काम करते अाहे. अातार्यंत अाम्ही २० हजार मुले, पालकांपर्यंत जावून ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला अाहे. अाता जागृतीसाठी रॅली काढत अाहोत. त्यासाठी प्रतिसादही चांगला अाहे. नुसरत खान पहाडे (संस्थापिका, कॅक्टसफाउंडेशन)