आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahaji Pawar Reelected As BJP District President

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार यांची फेरनिवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची फेरनिवड झाल्यानंतर सत्कार करताना आमदार योगेश टिकेकर. या वेळी राजेंद्र मिरगणे, शंकर वाघमारे, मकरंद कुलकर्णी आणि आमदार सुभाष देशमुख. छाया : दिव्य मराठी
सोलापूर - भाजपाचे जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी रात्री शिवस्मारक सभागृहात निवडणूक प्रमुख आमदार योगेश टिकेकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पाडली. जिल्हाध्यक्ष पदासाठी पवार, शंकर वाघमारेसह ३१ जण इच्छुक होते. सर्वांशी चर्चा करून पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भाजपा शहरध्यक्षपदी प्रा. अशोक निंबर्गी यांची मंगळवारी निवड करण्यात आली. बुधवारी जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी आमदार योगेश टिकेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद कुलकर्णी यांच्या उपस्थित निवड प्रक्रिया पार पाडली. त्यापूर्वी गोंधळ झाला. शहाजी पवार यांच्या नावास शंकर वाघमारे यांनी विरोध केला. बैठकीस खा. अॅड. शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण का दिले नाही? आदी जाब विचारला. आरोप-प्रत्यारोप झाले. अगोदर तालुकाध्यक्ष निवडी करा असा आग्रह करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आव्हान आमदार टिकेकर यांनी केले.

इच्छुकांचे नावे मागितले असता, शहाजी पवार, शंकर वाघमारे, संजीवनी पाटील, राजकुमार पाटील, श्रीकांत देशमुख, दशरथ काळे, मल्लिनाथ स्वामी यांच्यासह ३१ जणांनी नावे दिले. त्यांच्याशी बंद खोलीत वैयक्तीक चर्चा केली. दिड तास चर्चा नंतर भाजपा प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा. बनसोडे यांच्याशी चर्चा केल्याचे आमदार टिकेकर यांनी सांगितले आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून पवार यांच्या नावाची घोषणा केली. या वेळी मकरंद कुलकर्णी, आमदार सुभाष देशमुख, शिवाजी कांबळे, राजेंद्र मिरगणे, राजकुमार पाटील, अविनाश कोळी आदी उपस्थित होते.
वाघमारेंना अश्रू अनावर
अध्यक्षपदासाठीभाजपाचे प्रदेश सदस्य शंकर वाघमारे इच्छुक होते. त्यांच्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते प्रयत्नशील होते. पण शहाजी पवार यांच्या नावाची घोषणा होताच वाघमारे यांना अश्रू अनावर झाले. पक्षाचे आदेश मान्य असल्याचे म्हणत सभागृहातून निघून गेले.

निवडणुकांचे आवाहन
पक्षाने पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती नगर परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष, भाजप