आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वासराच्या आसवात बाई गं, भीम पाहाते बाई, भीम पाहाते बाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मलेभीम भेटतो बाई.., शेतात भीम पाहतो बाई.., तुझ्या हाती तुप आले, तुझ्या हाती साय.. पण समाजासाठी काय.., अो अॅक्टिंग करते भाई.., हम फॅटिंग करते भाई.., जी जी राजे शिवबा जी.. या शाहिरीसह डाॅ. आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे विचार मांडत शाहीर संभाजी भगत यांनी शाहिरी जलशातून प्रबोधनाचा जागर मांडला.

महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवारी सायंकाळी बुधवार पेठ येथील जी. एम. चौकात संविधान जलसा झाला. यावेळी ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, राजा सरवदे, प्रमोद गायकवाड, राजा इंगळे, राहुल सरवदे, सुबोध वाघमोडे, अॅड. संजीव सदाफुले आदी उपस्थित होते. नागरिकांची महिलांची विशेष उपस्थिती होती.

संभाजी भगत यांनी जनजागृती करत भीमगीते सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीत सादर केले. ते म्हणाले की, डाॅ. बाबासाहेबांचे विचार समाज बदलणारे होते हे अनेकांना माहीत नाही. जोतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. बाबासाहेबांनी शेतीवर लिखाण केले. येणारा काळ वाईट आहे, विचार मारले जातील. युद्ध विरोधी भूमिका बुद्धांनी घेतली. काही वेळात देशात धर्म उभे केले जाते. पायाभूत काम आपण केले पाहिजे, असे भगत यांनी जलसा सादर करताना म्हणाले.
नवीन नाटक
संभाजीभगत हे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित स्टॅच्यू आॅफ लिबर्टी हे नाटक लिहित आहेत. याशिवाय वेब टीव्ही आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...