आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता शक्ती कपूर सोलापुरात येणार,ट्रिपल चित्रपटाच्या चित्रीकरणात घेणार सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापुरातील युवा दिग्दर्शक पवन बनसोडे यांच्या ट्रिपल चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते शक्ती कपूर २६ जुलै रोजी सोलापुरात येणार आहे. जिझस फिल्म प्रॉडक्शनचा हा सिनेमा असून शक्ती कपूर हे सिनेमातील नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत काम करणार आहे. सिनेमाचे चित्रीकरण सोलापूर महापालिकेच्या परिसरात होणार असल्याची माहिती दिग्दर्शक पवन बनसोडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चित्रपटाची कथा तिहेरी प्रेम प्रकरणांवर आधारित असल्याने चित्रपटाचे नाव ट्रिपल असे ठेवण्यात आले. चित्रपटाची कथा पवन बनसोडे यांची आहे. तर पटकथा संवाद लेखनाचे काम कोल्हापूरचे नथानियल शेलार यांनी केले. चित्रपटात संजाली ठाकूर, अजय गायकवाड, राहुल देडे, समृद्धी शिमगे, निवेदिता सावेकर, प्रशांत माळी, युवराज जाधव आदींची भूमिका आहे. सिनेमाचे अर्धे चित्रीकरण झाले अाहे. सोलापूरच्या सेटलमेंट परिसरात सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण झाले असल्याचे पवन बनसोडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस युवराज जाधव, प्रशांत माळी, नथालियन शेलार, अजय गायकवाड, राहुल देडे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...