आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी सहजपणे काहीही बोलत नाही शिवसेना-भाजपवर पवारांचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- मी सहजपणे काहीतरी बोलत नाही, जे बोलतो ते विचारपूर्वकच असते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शी येथे शनिवारी व्यक्त केले. एका खासगी कार्यक्रमासाठी पवार बार्शी येथे आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, दादर येथील डॉ. आंबेडकर भवन पाडण्याचे नेमके कारण आपल्याला माहीत नाही. रत्नाकर गायकवाड हे एकेकाळी मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी कायदेशीर बाबी तपासल्या असाव्यात. त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनातील लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या असून याबाबत काही चूक झाली असल्यास क्षमा करण्यासारखे नाही. शासनाने याबाबत तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी.

पावसाने आेढ दिल्याने विदर्भ, हिंगोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे जळगाव अशा अनेक भागात पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या तारखा उलटून गेल्या आहेत. आता नवीन तारखा जाहीर होत आहेत. अनेक धरणाचे साठे आटले आहेत, उजनीची परिस्थिती तर पाणी नसल्यासारखीच आहे. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांत पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल.

युतीसत्ता सोडणार नाही : भाजपआणि शिवसेना दोघेही सत्ता सोडणारे नसून गळ्यात गळे घालून सत्ता भोगणारे आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आदी निवडणुकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढल्या असून त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील धोरणे ठरवले आहेत. लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या शेअर सर्टिफिकेटवर त्यांच्या परस्पर मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून रक्कम गोळा केली असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, हे प्रकरण मला माहीत नाही. मात्र, अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा असल्याचेही पवार म्हणाले.

अत्याधुनिक उपचार सुविधा माफक दरात उपलब्ध व्हाव्यात
माणसाचेजीवनमान सुधारून आयुष्यमान वाढत चालले आहे. त्याबरोबरच आरोग्याचे प्रश्नही वाढले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाल्याने नवनवीन प्रगत तंत्रज्ञानामुळे या प्रश्नांची सोडवणूक होऊन मनुष्याचे आयुर्मान वाढवणाऱ्या अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या उपचार सुविधा सर्वसामान्यांना परवडतील अशा माफक दरात उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, अयोग्य आहार पद्धतीमुळे दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. हृदयरोग म्हटले की पूर्वी घरात चिंतेचे वातावरण असायचे, परंतु आधुनिक उपचार सुविधांमुळे चिंता करण्याचे दिवस संपले आहेत. मोठ्या शहरांमध्ये असलेल्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत हॉस्पिटलच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...