आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण, शरद पवार यांचा नागरी सत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण होत असल्याने साेलापूर जिल्हावासीयांच्या वतीने फेब्रुवारीअखेरीस नागरी सत्कार करण्यात येणार आहे. 
 
सर्वपक्षीय समितीची लवकरच नियुक्ती करणार आहे. सत्कार समारंभ समितीच्या अध्यक्षपदी आमदार दिलीप सोपल तर स्वागत समिती अध्यक्षपदी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत इतर समिती सदस्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक महेश गादेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

२२ फेब्रुवारी १९६७ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आतापर्यंत एकाही संसदीय निवडणुकीत पराभव स्वीकारला नाही. या घटनेस २२ फेब्रुवारी २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पक्षप्रमुख शरद पवार यांना सोलापूर जिल्ह्याबद्दल विलक्षण जिव्हाळा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री माढा लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. विनंतीला मान देऊन श्री. पवारांनी सत्कार स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. 

सोहळ्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची समिती 
सत्कार समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असणार आहे. केंद्रीय स्तरावरील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. तो कोणत्याही एका पक्षाचा नसून, जिल्हावासीयांच्या वतीने हा नागरी सोहळा होणार आहे. संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा नागरी सत्कार प्रथम सोलापुरात होत आहे. यामुळे हा सोहळा भव्य करण्यात येणार आहे. पवार यांच्या संसदीय कारकीर्दीत महत्त्वपूर्ण घटना, काही फोटो, निर्णय यावरही एक प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याची माहिती महेश गादेकर यांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...