आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटवण्यात येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-मंदिर प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटवण्याबरोबरच होम मैदानाची स्वच्छता, करमणूक इतर दुकानांचे स्टॉल याचा आराखडा, भाविकांची सुरक्षा आदी प्रश्नावर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या. यात्रा कालावधीत धूळ होण्यासाठी मॅटिंग बंधनकारक राहणार असून यात्रेतील करमणुकीची साधने विविध दुकानांची जागा निश्चिती याचा विशेष प्लॅन तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुंढे मनपा आयुक्त विजय काळम-पाटील यांनी होम मैदान, सिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वार परिसराची पाहणी केली. यात्रा कालावधीत भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाला सूचना दिल्या. मंदिर समितीने स्टॉलचा आराखडा द्यावा, ते कोठे असतील हे आम्ही आराखड्यानुसार ठरवणार. मंदिर समितीला धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मॅटिंग करावेच लागेल. मॅटिंगवरून पाय घसरतात, हे कारण होऊ शकत नाही. पाय घसरणारे मॅटिंग उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्पष्ट केले.
होम मैदानपरिसराची पाहणी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यावेळी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार होम मैदान परिसरातील अतिक्रमण काढण्यात येईल. झाडे लावण्यात येणार आहे. याशिवाय इतर सूचनेनुसार काम करण्यात येणार आहे.'' लक्ष्मण चलवादी, मनपाप्रभावी नगर अभियंता

आराखडा आल्यानंतर निर्णय घेऊ
मंदिरसमितीला यात्रेसाठी होम मैदान दिले जाते. यामुळे होम मैदानावर जागेचा लिलाव करण्याचा मंदिर समितीला अधिकार नाही. शिवाय करमणुकीच्या ज्या विविध साधनांना परवानगी दिली जाते, त्याला पोलिस, बांधकाम, प्रदूषण, महापालिका यांची परवानगी घ्यावी लागते. यंदाच्या यात्रेत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सर्व बाबी कराव्या लागणार आहेत. यासंबंधीची माहिती देण्यासाठीच मंदिर समिती प्रशासनाची बैठक बोलावली होती. त्यांच्याकडून आराखडा आल्यानंतर यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे.'' तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी

रिपन हॉलबाबत तातडीने निर्णय घ्या
गुरुवारी सकाळी संयुक्त पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी मुंढे यांना रिपन हॉलची इमारत वापरात नसल्याचे दिसून आले. यावर आयुक्तांना विचारणा करताच ही इमारत पासपोर्ट कार्यालयास देण्यात येणार आहे, मात्र त्याठिकाणी पार्किंगसाठी जागा नसल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी रिपन हॉलचा तातडीने निर्णय घ्या, अन्यथा आम्ही ती इमारत प्रांताधिकारी कार्यालयाकरता भाड्याने घेणार असल्याचे सांगितले.