आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नंदादीप'वर बिनविरोधची चर्चा; तर शिंदे-म्हेत्रेंची निवडणुकीची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हामध्यवर्ती बँकेच्या बहुतांश जागा बिनविरोध व्हाव्यात यासाठी सत्ताधारी संचालकांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी (नंदादीप) येथे दिवसभर चर्चा केली.
दुसरीकडे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, संचालक सुरेश हसापुरे यांच्या अज्ञातस्थळी झालेल्या बैठकीत काही जागांवर निवडणूक लढवण्याची तयारीबाबत चर्चा झाली. बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले अर्ज मागे घेण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस आहे. पुन्हा चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत.

नंदादीपवर झालेल्या बैठकीला बँकेचे अध्यक्ष दिलीप माने, ज्येष्ठ संचालक खासदार विजयसिंह मोहिते, सुधाकर परिचारक, आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार दीपक साळुंखे, रणजितसिंह मोहिते, राजन पाटील, जयवंतराव जगताप, दिग्विजय बागल आदी उपस्थित होते. बँकेशी संलग्न असलेल्या सात संस्था प्रतिनिधी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला, माळशिरस करमाळा या तालुक्यांतील सोसायटी मतदारसंघातही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भातही चर्चा झाली.

पणन, कृषी मतदारसंघ, बँका, पतसंस्था, दुग्ध संस्था इतर मागास वर्गामध्ये अद्याप दिग्गज उमेदवार आहेत. विशेष म्हणजे ज्याठिकाणी अर्ज शिल्लक आहेत, त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे काँग्रेस भाजप पक्षाच्या उमेदवारांचे आहेत. यामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसेविका शोभा बनशेट्टी, काँग्रेसचे आमदार भारत भालके सिद्धाराम म्हेत्रे कल्याणराव काळे, देवानंद गुंड यांचा अर्ज आहे.

सिद्धाराम म्हेत्रेंसाठी व्यूहरचना
सिद्धारामम्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेसाठी मदत करावी. त्या बदल्यात त्यांना जिल्हा बँकेच्या इतर मागासवर्ग मतदारसंघातून बिनविरोध निवडून आणण्याचे आश्वासन परिचारक गटाने दिले आहे. यासंदर्भातही बुधवारी व्यूहरचना करण्यात आली. ती यशस्वी होते का? हे गुरुवारी दुपारपर्यंत समजणार आहे.
बातम्या आणखी आहेत...