आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: शिवजन्मोत्सव मिरवणूक, पारंपरिक वाद्यांसह, डॉल्बीवर थिरकली तरुणाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी सायंकाळी निघालेल्या शिवजन्मोत्सव मिरवणुकीत जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान मंडळाच्या ढोलपथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मंडळातील सर्व पदधिकारी या महिलाच आहेत. - Divya Marathi
रविवारी सायंकाळी निघालेल्या शिवजन्मोत्सव मिरवणुकीत जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान मंडळाच्या ढोलपथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मंडळातील सर्व पदधिकारी या महिलाच आहेत.
सोलापूर - जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष, भगव्या आरगजाची मुक्त उधळण, डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई अन् शिवरायांच्या प्रताप सांगणाऱ्या आकर्षक शिवमूर्ती अशा जल्लोषी वातावरणात रविवारी सोलापुरात शिवजयंती मिरवणूक निघाली. शिवभक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण शहराचे वातावरण शिवमय झाले होते. 
 
शहरात जन्मोत्सव उत्सवाची सांगता रविवारी मिरवणुकीने करण्यात आली. सायंकाळी शिंदे चौक परिसरातील डाळिंबी आड येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. या वेळी दास शेळके, धर्मा भोसले, राजन जाधव, पद्माकर काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मिरवणुकीत २४ मंडळांनी सहभाग घेतला. मिरवणुकीतील आकर्षक देखावे, शिवमूर्तीची करण्यात आलेली नयनरम्य सजावट आणि तरुणाईचा उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 
 
मिरवणुकीत थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळ, सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान, सळई मारुती युवक मंडळ आदी मंडळांनी डॉल्बी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. शिवराम प्रतिष्ठान, खड्डा तालीम शिवालय बहुउद्देशीय मंडळांनी लेझीम हा पारंपरिक खेळ सादर केला. मिरवणुकीच्या मार्गावर छत्रपती ग्रुपच्या वतीने रक्तदान करण्यायाठी जनजागृती करण्यात येत होती. 
 
डीएम ग्रुपने क्रेनच्या सहाय्याने गोलकार फिरणारे डिजिटल फलक आणले होते. त्यावर महापुरुषांचे फोटो वापरण्यात आले होते. तर पोलिस मुख्यालयाजवळच्या शिवराम प्रतिष्ठानने शिवरायांच्या मूर्तीसोबतच वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा देखावा केला होता. मिरवणुकीत एमजी ग्रुप, अवंतीनगर, डीएम ग्रुप, शिवनेरी प्रतिष्ठान, श्रीमंतराजे प्रतिष्ठान, शिवराम प्रतिष्ठान, खड्डा तालीम, शिवालय बहुउद्देशीय, पाणीवेस तालीम, टिळक चौक आदी प्रमुख मंडळांंनी सहभाग नोंदवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 
मिरवणुकीचा खर्च टाळून केले शालेय साहित्य वाटप 
शिवजयंती निमित्तमिरवणूक काढून डीजे, डॉल्बीवर खर्च करता त्यातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय विजापूर रस्त्यावरील अमृत नगरातील शिवयोद्धा तरुण मंडळाने घेतला आहे. जमा झालेली वर्गणी आणि स्वत:जवळील रक्कम घालून कॉलनीत वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्याचे ठरवले आहे. 
नवीन आरटीओ कार्यालयाजवळील अमृत नगरात शिवयोद्धा तरुण मंडळ आहे. शिवयोद्धा मंडळाने सामाजिक जाणीवेचे भान राखत परिसरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करून निर्णय घेतला आहे. शिवप्रतिमा प्रतिष्ठापना तर केली. पण यंदा त्यांनी स्पिकर किंवा अन्य गाजावाजा करता शांततेत शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले. यातून त्यांचे जवळपास तीन ते साडेतीन हजार रुपये वाचले आहेत. तसेच मिरवणुकीवर होणारा खर्चही टाळला आहे. अध्यक्ष महेश रणदिवे, राजू सुतार, स्वप्निल शिंदे, सुनील लालबोंद्रे आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...