आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर एसटी विभागात लवकरच वातानुकूलित 'शिवशाही' गाड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता ५०० नव्या गाड्यांचा समावेश हाेणार आहे. या गाड्या संपूर्ण वातानुकूलित असतील. विशेष म्हणजे यांचा दर प्रवाशांना परवडणारा असणार आहे. एसटी प्रशासनाने या गाडीचे शिवशाही असे नामकरण केले आहे.
राज्यातील सर्व एसटी विभागांना या गाड्या मिळतील. कोणत्या मार्गावर किती गाड्या सोडाव्यात याचा अभ्यास वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस या गाड्या सोलापूर विभागात दाखल होणार अाहेत.

महामंडळाने आपली सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेतल्या आहेत. रेल्वेने ज्या प्रकारे सर्व सामान्य प्रवाशांना वातानुकूलित दर्जाच्या डब्यातून प्रवास करता यावा म्हणून गरीब रथ ही गाडी सुरू केली. त्या धर्तीवर एसटी प्रशासन सामान्य प्रवाशांना वातानुकूलित गाडीतून प्रवास करता यावा म्हणून शिवशाही गाडी सुरू करणार आहे.
शिवनेरीच्या तुलनेने शिवशाही गाडीचे तिकीट दर कमी असणार आहे. प्रवाशांना दर परवडेल असे शिवशाहीचे तिकीट दर असणार आहे. त्यामुळे ‘शिवशाही’स प्रवाशांचा प्रतिसाद लाभेल, अशी आशा एसटी प्रशासनास आहे.

या आहेत सुविधा
गाडीतमोफत वायफाय सेवा, मोबाइल चार्जर पॉइंट, जीपीएस प्रणाली अशा सुविधांबरोबरच अासनांची चांगली व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना एसटीचा लांबचा प्रवास आरामदायक वाटेल.

‘शिवशाही’चे ‘शिवनेरी’ होऊ नये
एसटीप्रशासनाने मोठा गाजावाजा करत राज्यातील काही निवडक शहरांदरम्यान शिवनेरीची सेवा सुरू केली. मुंबई -पुणे या मार्गावरील शिवनेरीची सेवा वगळता राज्यातील अन्यत्र ठिकाणी शिवनेरीची सेवा ताेट्यात जात आहे. सोलापुरात तर याला खूपच कमी प्रतिसाद लाभत आहे. शिवनेरीमुळे प्रशासनास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी प्रशासन ‘शिवशाही’चे ‘शिवनेरी’ होऊ नये म्हणून राज्यातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असलेल्या मार्गावरच शिवशाही गाड्या सोडणार आहे.