आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली; तीन मंडळांवर गुन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिवजयंती उत्सवाची सांगता शुक्रवारी मिरवणुकीने झाली. यावेळी ७५ डेसिबलपेक्षा जास्त अावाजाची मर्यादा अोलांडल्यामुळे तीन मंडळांवर गुन्हे दाखल झालेत. विशेष म्हणजे २४ मंडळे यात सहभागी झाली होती. डफरीन, पार्क चाैक, सरस्वती चाैक, शिवाजी चौक या मार्गावर डाॅल्बीचा दणदणाट असताना फक्त एकच मंडळावर तर जोडभावी हद्दीत दोन मंडळावर गुन्हे दाखल अाहेत. कानठळ्या बसणारा अावाज असताना तीनच मंडळांवर कारवाई झाली. तत्कालीन पोलिस अायुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी शिवजयंतीमिरवणुकीत कंटेनरचा वापर केला. त्यामुळे वाहतूक अडथळा करून पोलिसांच्या नियमाचा भंग केला म्हणून चार मंडळावर गुन्हे दाखल झालेत. हवालदार शंकर मुळे यांनी फौजदार चावडीत फिर्याद दिली अाहे. जय महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष युवराज घाडगे, चालक सिध्दू इंचगिरी (रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. कंटेनर (एमएच १२ इक्यू २४४३) हे वाहन भागवत थिएटरसमोरून जात होते. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्या वाहनामुळे लोकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. दुसऱ्या घटनेत हवालदार संतोष पालकर यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली अाहे. सरस्वती तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन वाबळे, कंटेनरचालक अमोल नलावडे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तिसऱ्या घटनेत हवालदार चंद्रकांत जक्कापुरे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली अाहे. सात रस्ता परिसरात डीएम प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष निखिल भोसले, प्रकाश भोसले, बाळकृष्ण जाधव, संग्राम रिसवडकर, कंटेनरचालक स्वप्नील मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. चौथ्या घटनेत हवालदार गणेश जगताप यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली अाहे. हनुमान खड्डा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनील कामाठी, अरविंद मेकाले, कंटेनरचालक सद्दाम शेख (बाळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फडकुले सभागृहाजवळ ही कारवाई झाली.

देश भ्रतारयांनी केली होती सक्षम कारवाई : तत्कालीनपोलिस अायुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी अापल्या कारर्किदीत एकाही उत्सव मिरवणुकीत डाॅल्बीचा वापर करू दिला नव्हता. पोलिसांची नजर चुकवून डाॅल्बी मिरवणुकीत अाली तर जागेवरच ती जप्त केले होती. या सक्षम कारवाईमुळे ते सोलापुरात असेपर्यंत डाॅल्बीवर पूर्णपणे नियंत्रण अाले होते. सध्याचे चित्र वेगळे अाहे. मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडूनही कारवाई करण्यात पोलिसांची हतबलता दिसून अाली.
पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी उत्सवापूवीॅ मंडळांच्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन डाॅल्बी लावू नाका, पांरंपारीक वाद्य लावा अशा सूचना केल्यातरी मंडळाचे कायॅकतॅ डाॅल्बीचा वापर केला. शहरात डाॅल्बीचा येऊ देणार नाही असे पोलिस म्हणाले होते. यावरून पोलिसांना डाॅल्बीवर नियंयत्रण अाणते अाले नाही असे दिसून येते. काही जाणकार नागरिकांना डाॅल्बीमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.

जोडभावी हद्दीत दोन गुन्हे
तुळजापूर वेस येथील श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, चालक समीर शेख टिळक चौक येथील शिवशृष्टी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत सोनके, चालक अमर यककलदेवी यांच्यावर जोडभावी पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे. यांच्यावरही डाॅल्बीची अावाज मर्यादा उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अाहे.

मिरवणुकीत कंटेनरचा वापर, चार मंडळांवर गुन्हे दाखल
शिवजयंतीमिरवणुकीत कंटेनरचा वापर केला. त्यामुळे वाहतूक अडथळा करून पोलिसांच्या नियमाचा भंग केला म्हणून चार मंडळावर गुन्हे दाखल झालेत. हवालदार शंकर मुळे यांनी फौजदार चावडीत फिर्याद दिली अाहे. जय महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष युवराज घाडगे, चालक सिध्दू इंचगिरी (रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. कंटेनर (एमएच १२ इक्यू २४४३) हे वाहन भागवत थिएटरसमोरून जात होते. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्या वाहनामुळे लोकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. दुस-या घटनेत हवालदार संतोष पालकर यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली अाहे. सरस्वती तरूण मंडळाचे अध्यक्ष सचिन वाबळे, कंटेनरचालक अमोल नलावडे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तिस-या घटनेत हवालदार चंद्रकांत जककापूरे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली अाहे. सातरस्ता परिसरात डीएम प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष निखील भोसले, प्रकाश भोसले, बाळकृष्ण जाधव, संग्राम रिसवडकर, कंटेनरचालक स्वप्नील मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. चौथ्या घटनेत हवालदार गणेश जगताप यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली अाहे. हनुमान खड्डा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनील कामाठी, अरविंद मेकाले, कंटेनरचालक सद्दाम शेख (बाळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फडकुले सभागृहाजवळ ही कारवाई झाली.

देश भ्रतारयांनी केली होती सक्षम कारवाई : तत्कालीनपोलिस अायुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी अापल्या कारकीॅदीत एकाही उत्सव मिरवणुकीत डाॅल्बीचा वापर करू दिला नव्हता. पोलिसांची नजर चुकवून डाॅल्बी मिरवणुकीत अाली तर जागेवरच ती जप्त करून कारवाई होत होती. या सक्षम कारवाईमुळे ते सोलापुरात असेपर्यंत डाॅल्बीवर पूर्णपणे नियंत्रण अाले होते. सध्याचे चित्र वेगळे अाहे.

वर्षात डाॅल्बीवर गुन्हे
२०१४ : ५१ गुन्हे
२०१५ : ४७ गुन्हे
९० दिवसात परिमंडळ उपायुक्त कार्यालयाकडून न्यायालयात चार्जशीट दाखल होतात
डाॅल्बीचा नियम तोडल्यास यापुढेही कारवाई होणार
न्यायालयाच्या निर्देशानुसार ७५ डेसिबलपेक्षा जास्त अावाज ठेवता येणार नाही. या नियमाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई झाली अाहे. यापुढेही कारवाई राहील. मंडळांनी नियम पाळावेत, असे अावाहन फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी केले.

आवाज १०४ डेसिबलच्या पुढे
श्रीमंतराजे महामंडळाच्या मिरवणुकीत तब्बल १०४ डेसिबलपर्यंत अावाज मर्यादा गेल्यामुळे अध्यक्षांसह तेरा जणांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला अाहे. हवालदार भीमराव इंगळे यांनी फिर्याद दिली अाहे. पार्क चौकात हा प्रकार घडला. मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लोंढे, पंकज लोंढे, प्रवीण पवार, रोहित गायकवाड, सुशील कस्तुरे, अक्षय सुरवसे, सद्दाम सय्यद, अजय डोंगरे, प्रतीक लोंढे, महेश दिवाणजी, सागर नागनकेरी, डाॅल्बीचालक सचिन पतंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. मंडळाचे अध्यक्ष डाॅल्बीचालक यांना पोलिसांनी नोटीस दिली होती. तरीही डाॅल्बीची अावाज मर्यादा ७५ डेसिबल असताना १०४ पर्यंत गेल्यामुळे गुन्हा दाखल झाला.