आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना : २ तासात ५०० मुलाखती, खासदार राहुल शेवाळे यांची होती उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. या वेळी अवघ्या अडीच तासांत ५०० इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. मॅरेथॉन मुलाखतीमुळे परिसर मात्र भगवेमय झाला होता. 

शनिवारी पाच वाजल्यापासून जुनी मिल कंपाउंड येथील सेना भवनात शिवसैनिकांची लगबग वाढली होती. रात्री साडेआठ वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या. इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आपल्या समर्थकांसह सेना भवनासमोर गर्दी केली होती. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. 

गळ्यात भगवे उपरणे, हातात भगवा झेंडा घेऊन हजारो समर्थक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत होते. मुलाखतीवेळी जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, धनंजय डिकोळे, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड उपस्थित होते. 

यांनी केले जोरदार शक्तिप्रदर्शन : सुनीलकामाठी, हरिभाऊ चाैगुले, बाळासाहेब गायकवाड, राजू बिराजदार, राजश्री पाटील, भागवत जोगधनकर, बाबा सूर्यवंशी, रविकांत कांबळे, सुजाता चौगुले, महादेव बिद्री, तात्या भवर, आबा सावंत, भारती बनसोडे. 
 
योग्य सन्मान दिला तरच युती 
सर्वांचीचइच्छा युती करण्याची आहे. आमचीही युती करण्याचीच इच्छा आहे. मात्र भाजपने आम्हाला योग्य सन्मान दिला पाहिजे. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा जुन्या फॉर्म्युल्यावरच आधारित आहे, असे खासदार शेवाळे यांनी सांगितले. तसेच सोलापुरातल्या युतीबाबत वरिष्ठ स्तरावरून चर्चा सुरू आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लवकरच काय ते जाहीर केले जाईल. मात्र यंदाच्या निवडणुकीत महापालिकेवरची काँग्रेसची सत्ता संपुष्टात आल्याशिवाय राहणार नसल्याचे असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...