आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही एसटी देणार अलिशान, अत्याधुनिक प्रवासाचा अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिवशाहीएसटी आरामदायक लांब पल्ल्याचा प्रवास अगदी माफक दरात देण्यासाठी सज्ज झाली आहे. अत्याधुनिक प्रवासाचा अनुभव याद्वारे मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. 
 
स्मार्ट सिटीला साजेशी अशी अत्याधुनिक, वातानुकूलित शिवशाही एसटी गाडी सोलापूर ते पुणे अशी रोज सेवा देणार आहे. राज्य परिवहन मंडळ, सोलापूर आगारातर्फे सुरू करण्यात आलेल्या या अलिशान बसचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या वेळी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले, शिवशाही वातानुकूलित बसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच बसचे भाडेही प्रवाशांना परडेल इतकेच आकारण्यात आले आहे. शिवशाही बस सुविधेचा लाभ जिल्ह्यातील प्रवाशांनी घ्यावा. प्रवाशांना एसटी प्रवासादरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रयत्न असल्याचेही परिवहन राज्यमंत्री देशमुख यांनी सांगितले. 
 
शिवशाही बस सकाळी सहा वाजता सोलापूर येथून निघेल. ती पुणे येथे सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच सायंकाळी सहा वाजता पुणे येथून निघून ती सोलापूर येथे रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचेल. प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार असल्याचेही परिवहन राज्यमंत्री श्री. देशमुख यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमास विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी प्रवासी उपस्थित होते. 
 
तिकीट ३९५ रुपये 
विभागनियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी माहिती देताना सांिगतले की, बससेवेसाठी सोलापूर ते पुणे सुमारे ३९५ रुपये इतके तिकीट दर आहे. प्रवाशी ऑनलाइन सुविधेचाही लाभ घेऊ शकतात. सोलापूर-पुणे या प्रवासी मार्गावर प्रवाशांना वातानुकूलित सेवा, तसेच आरामदायी आसनाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवशाही बसची वैशिष्ट्ये 
- आसन क्षमता ४३ इतकी आहे 
- बसमध्ये वायफाय सुविधा 
- एलईडी व्हिडिओ कोच 
- वातानुकूलित यंत्रणा 
- जीपीएस सिस्टिम 
- तीन सीसीटीव्ही 
- डस्टबीनची सोय 
- प्रशिक्षित चालक
- माफक म्हणजे केवळ ३९५ रुपये तिकीट दर 
 
बातम्या आणखी आहेत...