आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या महापौरपदी BJPच्या शोभा बनशेट्टी; पुण्यात महापौरपदासाठी मुक्ता टिळक यांची निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली. यांना सर्वाधिक 49 मते मिळाली. तर उपमहापौरपदी शशिकला बट्टल यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना 21 मते पडली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना १८ मते मिळाली. 102 सदस्य असलेल्या महापालिकेत बसपच्या चारही सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. एमआयएमच्या नूतन गायकवाड यांनीही महापौरपदासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली.
 
दुसरीकडे पुण्यात भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौरपदाचा उमेदवार म्हणून मुक्ता टिळक यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे उपमहापौरपदीसाठी आरपीआयचे नवनाथ कांबळे यांचे नाव समोर आले आहे. दोन्ही उमेदवार लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.दरम्यान, सोलापुरात भाजपला प्रथमच सत्ता मिळाली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेचा पाठिंबा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेनेनेही या निवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला होता.

शोभा बनशेट्टी यांच्या रुपाने लिंगायत समाजाला संधी...
सोलापूरला शोभा बनशेट्टी यांच्या रूपाने लिंगायत समाजाचा महापौर मिळाला आहे. लिंगायत समाजाला तब्बल 25 वर्षांनंतर महापौरपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी विश्वनाथ चाकोते हे 1992 मध्ये महापौरपदी निवडून आले होते.

सासर्‍यांनंतर सुनेला महापौरपदाची संधी...
शोभा बनशेट्टी यांचे सासरे विश्वनाथ बनशेट्टी हे 1971 मध्ये महापौर झाले होते. नंतर ते  सलगल 50 वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शोभा बनशेट्टी यांनी सासर्‍यांच्या पावलांवर पाऊल ठेवले आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप-49
शिवसेना-21
काँग्रेस-14
एमआयएम-9
राष्ट्रवादी-4
बसप-4
माकप-1
बातम्या आणखी आहेत...