आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वजनाची हार्डवेअर खरेदी; साहित्य केले सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर विविधकामासाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडून अभिप्राय नसताना महापालिका नगर अभियंता कार्यालयाने खरेदी केले. त्या साहित्याचे वजन टेंडरमधील कामानुसार नसून कमी वजनाचे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ते साहित्य सील करण्यात आले आहे. नगरसेवक दिलीप कोल्हे यांच्या तोंडी तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
हार्डवेअरचे ५१ प्रकारचे साहित्य खरेदी मनपाकडून केले जाते. त्यासाठी टेंडर मागवण्यात आले आहे. या साहित्य खरेदीत त्रुटी असताना त्यांची पूर्तता नगर अभियंता कार्यालयाकडून करण्यात आली नाही. ज्या कंपनीचे साहित्य घेणे आवश्यक असताना ते केले नाही. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. टाटा मेक कंपनीचे फावडे १.४० किलो असणे आवश्यक असताना त्या शिवाय इतर कंपनीचे खरेदी केले त्याचे वजन १.१० किलो इतके आहे. त्याचे वजन कमी आहे. लोखंडी टिकाव तीन किलोचे आवश्यक असताना २.१३ किलोचे खरेदी केले. या मालाची आवक मनपा स्टोअर विभागाच्या रजिस्टरला नोंद केली नाही.

साहित्यसील : फावडे,टिकाव आणि टोपले महापालिकेने सील केले आहे. उपअभियंता शांताराम अवताडे आणि लोखंडे यांनी पंचनामा करून साहित्य सील केले.
तातडीचेकारण : मक्तेदाराचामक्ता निश्चित केला आहे. महत्त्वाच्या कामासाठी फावडे, टिकाव, टोपले यांची आवश्यकता असल्याने तात्पुरते साहित्य घेतले आहे. प्राथमिक चौकशीसाठी साहित्य सील केले आहे असे नगर अभियंता कार्यालयाकडून सांगण्यात अाले.
चौकशी करा

^खरेदीकेलेले साहित्य कमी वजनाचे आहेत. त्यामुळे त्या प्रकरणी चौकशीची मागणी गुरुवारी केली. आयुक्त इतर अधिकारी उजनी जलवाहिनी तपासणी मोहिमवर होते. त्यामुळे ते साहित्य सील केले. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दिलीपकोल्हे, नगरसेवक