आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shortage, Drought Planning, Not Spendings Fund All Issue In Meeting

टंचाई, दुष्काळ नियोजन, अखर्चित निधी गाजणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी होत आहे. दुष्काळ नियोजनासाठी घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेतील नियोजनातील प्रस्ताव सूचनांप्रमाणे झालेली कार्यवाही, तरतूद केलेले कोट्यवधी रुपये विकासकामांवर मुदतीत खर्च झाले नाहीत. तसेच, पाणीटंचाईची तीव्रता आदी मुद्दे यात ऐरणीवर असतील.

ग्रामपंचायत विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सभा लांबली होती. यापूर्वी सप्टेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर ती डिसेंबरमध्ये होणे अपेक्षित होती. आता जानेवारीत होत आहे. सोमवारी दुपारी दोनला सुरू होईल.

मागील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी सदस्यांनी थेट पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिक्षकांच्या नियुक्तीचा घोळ अद्याप मिटलेला नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, आंतरजिल्हा बदली झालेले पण नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेल्या शिक्षकांच्या प्रश्नांचे घोंगडे अद्याप भिजत आहे.

विषय समित्यांकडील सेस फंडाचा अखर्चित निधीचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना होणारा त्रास अन् नुकत्याच झालेल्य ग्रामपंचायत निवडणुकीचा त्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला काही भागामध्ये बसलेला फटका याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. गौण खनिज निधी खर्चास झालेल्या गैरप्रकाराबाबत माजी विरोधीपक्षनेते संजय पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची चौकशी प्रक्रिया सुरू झाली. पण अद्याप त्याबाबत फार प्रगती झाली नसल्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.