आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये शिवसैनिकांची ताकद दाखवून द्या - राहुल शेवाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पण नंतरच्या काळात अंतर्गत गटबाजीमुळे सोलापूरचा बालेकिल्ला ढासळला.येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर भगवा फडकवून सोलापूर हे शिंदे परिवाराचे नाही तर शिवसैनिकांचे असल्याचे दाखवून द्या असे आवाहन खासदार तथा सोलापूर जिल्हाचे संपर्क नेते राहुल शेवाळे यांनी केले.

सुशील रसिक सभागृहात रविवारी झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात शेवाळे बोलत होते. यावेळी डॉ धवलसिंह मोहिते, पुरुषोत्तम बरडे, महेश कोठे, प्रताप चव्हाण,उत्तमप्रकाश खंदारे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, नगरसेवक मनोज शेजवाल उपस्थित होते. शिवसेना मेळाव्यात राहुल शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते.
शिवसेनेच्या सुवर्णमहाेत्सवी वर्षानिमित्त चित्ररथ जिल्ह्यात फिरणार : शेवाळे म्हणाले, येत्या १९ जूनला शिवसेना पक्षाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. त्याच भाग म्हणून जिल्ह्यातही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. १५ ते १९ जून दरम्यान चित्ररथ तयार करून तो जिल्ह्यात फिरवण्यात येणार आहे. या चित्ररथांवर विविध प्रकारची माहिती देण्यात येणार आहे. गटप्रमुख हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा शिवसैनिक असल्याचे सांगून निवडणुकीत यश मिळविण्यासाठी गटप्रमुखांची खूप मोठी मदत लागणार आहे. त्यामुळे गटप्रमुखांची निवड योग्य होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...