आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझाच धर्म खरा’ म्हणणारे तिसरे महायुद्ध लादतील, सिद्धाराम पाटील यांनी सांगितले विवेकानंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जगात केवळ धर्मासाठी रक्तपात झाला. ‘माझाच धर्म खरा’ म्हणणारे तिसरे महायुद्ध लादतील. चौथ्या महायुद्धात एकमेकांवर दगड फेकून घेतील. कारण तेव्हा काहीही उरलेलं दिसणार नाही. पण...तसे होणार नाही. कारण भारत जिवंत आहे. याच देशातल्या स्वामी विवेकानंदांनी खरा धर्म सांगितलेला आहे. हिंदू धर्माकडून आलोय, असे सांगताना इतरांचेही धर्म सत्य आहेत, हे त्यांचे विधान आहे. सॅम्युअल हॅटिंग्टन या परदेशी तत्त्वज्ञानाने हे लिहून ठेवल्याचे ‘दिव्य मराठी’चे मुख्य उपसंपादक सिद्धाराम पाटील यांनी सांगितले. 
 
उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीने आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘भावी धर्म आणि स्वामी विवेकानंद’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. स्वामींच्या भाषणांतील परखड मतांचे दाखले देत श्री. पाटील यांनी विवेकानंदांना अभिप्रेत असा धर्म मांडला. गवतावर उगवणाऱ्या दवबिंदूसारखी भारतीय संस्कृती आहे. हे दवबिंदू कुठून येतात कळत नाही, त्याप्रमाणे या संस्कृतीत समूह कसा मिसळून जातो हे कळणार नाही, असे ते म्हणाले. 
 
चीन झोपलेला दैत्य 
अखंडभारताविषयी बोलताना, श्री. पाटील यांनी चीनच्या सद्य:स्थितीचाही वेध घेतला. देशाची ३५ हजार चौरस किलोमीटरची भूमी चीनने गिळंकृत केली. तेथील शालेय शिक्षणात मात्र चीनचाच भाग भारताने ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. डोकलाम प्रकरणात ठाम भूमिका घेतली म्हणून उभय देशांचे सैन्य माघारी फिरले. अशीच भूमिका तिबेटच्या वेळी घेतली असती तर हा भूभाग देशातच राहिला असता. चीनबद्दल स्वामी म्हणाले होते, ‘चीन म्हणजे झोपलेला दैत्य आहे. त्याला वेळीच शहाणे करा...’ 
 
 
बातम्या आणखी आहेत...