आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्त म्हणाले, जिल्हाधिकारी आम्हाला आदेश देऊ शकत नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जानेवारीत होत असलेल्या सिद्धेश्वर यात्रेच्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमधील अधिकाराच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश देऊ नयेत’, असे पत्र पोलिस आयुक्तांनी धाडले आहे, तर आपल्याला तसे अधिकार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’कडे स्पष्ट केले आहे.
सिद्धेश्वर देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील वाद निवळलेला नाही. तशात हा वाद सुरू झाला आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या अधिकारावरून असा मुद्दा यापूर्वी येथे उपस्थित झालेला नव्हता. ही घटना पहिल्यांदाच घडत आहे.

सिध्देश्वर यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था अापत्ती व्यवस्थान यंत्रणा सांभाळण्यासाठी पोलिस अायुक्तालय सक्षम अाहे, पोलिस अायुक्तांची ती जबाबदारी अाहे, त्यामुळे तुम्ही अाम्हाला अादेश देऊ नका. द्यायचे असेलच तर गृह िवभागाला पत्रे द्या, असे पत्र पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या सहीनिशी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे.

ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्री. मुंढे यांनी नियोजन बैठका घेऊन पोलिस अायुक्त, महापालिका आयुक्त आदींना अादेशवजा सूचना दिल्या. त्यातून जिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्यांत नाराजी पसरली अाहे. त्याचेच पडसाद पोलिस अायुक्तांच्या पत्रात उमटले अाहेत. त्यात ‘आदेश देण्याऐवजी केवळ समन्वय ठेवावा’, असे सुचित केले अाहे. शिवाय सर्व कर्तव्ये पार पाडण्यास पोलिस आयुक्त जबाबदार असतात, असेही नमूद केले आहे.

१. सर्व कार्यकारी दंडाधिकारी, अतिरिक्त दंडाधिकारी वगळता, हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दुय्यम असतील आणि उपविभागात काम पाहणारे प्रत्येक कार्यकारी दंडाधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी वगळता इतर) हे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दुय्यम असतील, बाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे सामान्य नियंत्रण.

२. जिल्हा दंडाधिकारी हे वेळोवेळी, नियम करू शकतील किंवा विशेष आदेश देऊ शकतील या संहितेप्रमाणे, त्यांना दुय्यम असलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांमध्ये कामाची विभागणी करण्यासाठी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना कामासाठी आदेश देऊ शकतील.

‘सीआरपीसी २३’ मध्ये काय?
बंदोबस्त अामची जबाबदारी

^‘सीआरपीसी’विषयीमलामाहिती नाही. पोलिसांकडे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी अाहे. यात बदल अथवा सूचना असतील तर ते माझे वरिष्ठ देतील. यात्रेची तयारी सुरूच अाहे.” रवींद्र सेनगावकर, पोलिसअायुक्त

सोलापूर शहरात महाराष्ट्र शासनाने पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केलेला असून कायदा सुव्यवस्था, रहदारी नियंत्रण, गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस आयुक्त यांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असल्याने या विभागाला आदेश वजा पत्र पाठवता समन्वय राखण्यासाठी पत्र पाठवणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरेल. हा विभाग प्रशासकीयदृष्ट्या गृहविभागांतर्गत काम करतो. इतर विभागाने जर निर्देश द्यावयाचे झाल्यास गृहविभाग वा पोलिस महासंचालक यांच्यामार्फत निर्देश देणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरेल. वरील सर्वप्रकारची कर्तव्ये पार पाडण्यास पोलिस आयुक्त जबाबदार असतात.

‘सीआरपीसी २३’ प्रमाणे जिल्हाधिकारी हाच प्रमुख
^एका जिल्ह्यासएक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इतर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात. सीआरपीसी कायद्यांतर्गत कलम २३ नुसार जिल्हादंडाधिकारी या पदाची व्याख्या करण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी हाच प्रमुख असतो.” तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...