आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिद्धेश्वर’ची निवडणूक अविरोध, शिवदारेंच्या नेतृत्वावरच विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेची निवडणूक मंगळवारी दुपारी अविरोध झाली. बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांच्या आवाहनाला इच्छुकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत, १२ जणांनी माघार घेतली. बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले, उपाध्यक्ष नरेंद्र गंभिरे यांच्यासह शशिकांत तळे, तुकाराम काळे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. नव्या संचालक मंडळात सहा नवीन चेहरेही अाहेत.

बँकेच्या १५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९६ अर्ज आले होते. छाननीत तब्बल ६१ अर्ज नामंजूर झाले. त्याला मुख्य कारण होते, बँकेच्या पोटनियमातील दुरुस्तीनुसार १० हजार रुपयांचे शेअर्स (समभाग) आणि ५० हजारची ठेव असणारेच उमेदवारीस पात्र ठरवले गेले. मंगळवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.२० जणांनी अर्ज मागे घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी बी. टी. लावंड यांनी ही निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले.

सोलापूर सिद्धेश्वर बँकेची निवडणूक अविरोध झाली. त्यानंतर नूतन संचालकांनी बँकेचे मार्गदर्शक तम्मा गंभिरे आणि राजशेखर शिवदारे यांचा सत्कार केला.

अभ्यासूंची केली निवड
बँकेचीउत्तम प्रगती असल्याने सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बँकेच्या आणखी प्रगतीसाठी अभ्यासू आणि व्यापारी दृष्टिकोन असणाऱ्यांची गरज अाहे. त्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, धर्मराज काडादी, तम्मा गंभिरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सहा नवे चेहरे, उर्वरित जुनेच
मल्लिनाथविभूते, श्रीशैल बनशेट्टी, अॅड. मल्लिनाथ पाटील, नागनाथ जावळे, बसवराज दुलंगे आणि रूपाली बिराजदार हे सहा नवीन चेहरे आहेत. उर्वरित नवे संचालक तसे जुनेच आहेत. त्यांची नावे अशी : प्रकाश वाले, नरेंद्र गंभिरे, शशिकांत तळे, चंद्रकांत रमणशेट्टी, पशुपती माशाळ, सुचेता थोबडे, बसवराज माशाळे (अक्कलकोट), तुकाराम काळे, अशोक लांबतुरे.

कोटींची नफा
दिवंगतसहकारमहर्षी वि. गु. शिवदारे यांनी १९७६ मध्ये बँकेची स्थापना केली. त्या वेळी फक्त लाखांचे भागभांडवल होते. सध्या ४१ कोटी ६० लाखांचा निधी अाहे. ३४३ कोटी ७६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. १६६ कोटी रुपयांची कर्जे दिली. ३१ मार्चअखेर बँकेला कोटी लाख रुपयांचा नफा झाला, अशी माहिती श्री. शिवदारे यांनी दिली.