आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर एक्स्प्रेसला साडेतीन तास उशीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तिलाटी रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने दक्षिणेकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना उशीर होत आहे. सोमवारी उद्यान एक्स्प्रेस मुंबईला अडीच तास उशिरा पोहोचली. उद्यान एक्स्प्रेस मुंबईला पोहोचल्यानंतर ती गाडी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेस नावाने सोलापूरला येते. उद्यानला पोहोचण्यास उशीर झाल्याने सोमवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने निघाली. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजता येणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सकाळी साडेदहा वाजता सोलापूर स्थानकावर आली.
बातम्या आणखी आहेत...