आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोला हर्रच्या जयघोषात तैलाभिषेक, नंदीध्वजांच्या लक्षवेधी मिरवणुकीने उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: हिरेहब्बू वाड्यात पूजा करताना सुशीलकुमार शिंदे, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, देवस्थान समिती अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार प्रणिती शिंदे आदी मान्यवर दिसत आहेत. दुसरे छायाचित्र मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक निघाली तेव्हा औक्षण करण्यासाठी थांबलेल्या सुवासिनींचे.
सोलापूर - पांढऱ्याशुभ्र बाराबंदीचा पेहराव केलेले शेकडो भक्त... एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र... सिद्धेश्वर महाराज की जय... म्हणत शिवयोगी सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना बुधवारी विधिवत तैलाभिषेक करण्यात आला. यात्रेच्या पहिल्या दिवशी मानाच्या सात नंदीध्वजांनी ६८ लिंगांना तैलाभिषेक करत शहर परिक्रमा पूर्ण केली. उत्तर कसबा येथील हिरेहब्बू निवासजवळ सकाळी आठ वाजता मानाचे सातही नंदीध्वज एकत्र आले. पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. मानाच्या सातही नंदीध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. नंदीध्वजांच्या पूजेला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, महापौर सुशीला आबुटे, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार शिवशरण पाटील, अमोल शिंदे, प्रकाश वाले, महादेव चाकोते, अॅड. रितेश थोबडे, गुंडप्पा कारभारी, महादेव पाटील, महेश अंदेली आदी मान्यवर सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी पंचाचार्यांचा ध्वज होता. यानंतर सिद्धेश्वरांची पालखी आणि याच्या पाठीमागे सजवलेले मानाचे सातनंदी ध्वज होते. नंदीध्वज मार्गस्थ झाल्यानंतर वाटेत सुहासिंनीनी नंदीध्वजाची मनोभावे पूजा केली. ६८ लिंगांना तैलाभिषेक झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज पुन्हा उत्तर कसबा येथील हिरेहब्बू यांच्या मठात विसावले.

सव्वा महिन्याच्या अर्पिताला आशीर्वादाचा मान : मसरेगल्लीत अर्चना पट्टनभुई यांनी आपली सव्वा वर्षाची कन्या अर्पिताला मानाच्या पहिल्या काठीसमोर अलगद झोपवले. अर्पिताला ओलांडून नंदीध्वजांची मिरवणूक पुढे निघाली.
यंदाही झाला सरकारी आहेर
यंदाच्या वर्षी प्रशासन आणि मंदिर समतीत वाद झाले असले तरी प्रथेप्रमाणे नंदीध्वज दुपारी साडेअकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मानकऱ्यांना सरकारी आहेर देण्यात आला. सरकारी आहेर देण्याची परंपरा ब्रिटीशकाळापासून सुरू आहे. सरकारी आहेर घेतल्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या अमृत लिंगास मानकरी हिरेहब्बू यांनी हळद, तेल आणि विडा ठेवून तैलाभिषेक केला.
सव्वा महिन्याच्या अर्पिताला आशीर्वादाचा मान : मसरेगल्लीत अर्चना पट्टनभुई यांनी आपली सव्वा वर्षाची कन्या अर्पिताला मानाच्या पहिल्या काठीसमोर अलगद झोपवले. अर्पिताला ओलांडून नंदीध्वजांची मिरवणूक पुढे निघाली.
बाराबंदीचा जनसागर : बारा बंदीचा पांढरा शुभ्र पोशाख, डोईवर पांढरा फेटा बांधलेले असंख्य भाविक, लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. सुवासिनींनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती. अनवानी पायांनी अनेक भाविक या ६८ लिंग प्रदक्षिण सहभागी झाले होते.