आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर यात्रा बुधवारपासून, श्री सिद्धेश्वर पंच कमिटी अध्यक्ष धर्मराज काडादी यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेस बुधवारी (दि.१३) यण्णीमज्जन कार्यक्रमाने सुरुवात होणार अाहे. यानिमित्त प्रथेप्रमाणे अक्षता सोहळा, होम प्रदीपन, शोभेचे दारूकाम आदी विधी होतील. १७ जानेवारी कप्पडकळी कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल, अशी माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

यात्रेच्या नियोजनावरून मंदिर समिती आणि प्रशासन यांच्यातील वाद शिगेला पोहोल्याने यात्रा भरणार का? अशी शंका सोलापूरकरांमध्ये होती. आज मंदिर समितीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गड्डा यात्रा होईल असे जाहीर केले.१३ जानेवारीला ६८ लिंगांना तैलाभिषेक करून यात्रेस प्रारंभ हाेईल. तसेच, प्रथेप्रमाणे इतर विधी पार पडतील असे काडादी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस अॅड. आर. एस. पाटील, गुंडप्पा कारभारी, रामकृष्ण नष्टे, चिदानंद वनारोटे, मल्लिनाथ जाेडभावी, गिरीश गोरनळ्ळी, सिद्धेश्वर बमणी, गौरीशंकर डुमणे, अॅड. व्ही. एस. आळगे, अॅड. मिलिंद थोबडे, मल्लिकार्जुन कळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अक्षता सोहळ्यासाठी एलइडी स्क्रीन
अक्षता सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दोन मोठे एलसीडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. एक स्क्रीन पार्क जवळील जलतरण तलावाच्या खालील भागात दुसरा स्क्रीन भाविकांची गर्दी पाहून जागा ठरवण्यात येईल.

सीसीटीव्ही सुरक्षा रक्षकाची राहणार नजर
यंदा संपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी २० ते २२ सीसीटीव्ही विविध भागांत लावण्यात येणार आहेत. तसेच, सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात आली अाहे. रात्रीही मंदिर तलाव परिसरात हे रक्षक तैनात असतील. रविवारी सकाळपासून मंदिराच्या गर्भगृहातील बाह्यबाजूच्या जागेत लावण्यात येणाऱ्या चांदीच्या खांबांसाठी चर मारण्यात येऊन लोखंडी बारचे सुरक्षा भिंतीचे काम सुरू करण्यात आले अाहे. सोमवारी ते चांदीचे खांब लावण्यात येत आहेत.

१३ ते १७ कृषिप्रदर्शन
यंदा१३ ते १७ जानेवारी दरम्यान होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन असून यात कृषी क्षेत्राशी निगडित असणारे विविध स्टॉल्स् , अवजारे, पंप, जैविक खते, ट्रॅक्टर्स, ठिबक सिंचन प्रकल्प आदींचा समावेश असेल.