आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत फ्लाॅवरचे तेलसंग बंधू करताहेत श्रावणमासात सिद्धेश्वर मंदिरातील सजावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिद्धेश्वर मंदिरातील सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीला श्रावणातील सोमवारी फुलांनी कल्पकतेने सजविण्याचा उपक्रम येथील भारत फ्लॉवर स्टॉलचे तेलसंग कुटुंब मागील ५० वर्षांपासून करीत आहे. (कै.) शिवलिंग जिरगे, श्रीशैलप्पा लब्बा, गंगाधर कळके यांनी १९६० मध्ये योगीराज भक्त मंडळाची स्थापना केली. येथील मंठाळकर परिवाराने काही काळ सजावट केली. नंतर (कै.) शंकरराव वीरभद्रप्पा तेलसंग फुलांचा व्यवसाय करत सिद्धरामेश्वरांच्या भक्तीपोटी सजावटीची प्रथा सुरू केली. त्यांच्या पश्चात ही पुष्पसेवा त्यांचे भारत मंजुनाथ ही मुले सांभाळत आहेत.

मुस्लिम कलावंतांची सेवा : शंकररावतेलसंग यांच्या पहिल्या कामापासून आजपर्यंत ही सजावट कामे मुस्लिम कारागीरच करतात. यात रज्जाक शेख, शुकूर कल्याणी, बाबू अरब, झाकीर चौधरी आदींचा समावेश आहे. जातीधर्माच्या भिंती लांघून ही मंडळी तितक्याच तन्मयतेने कामे करतात हे विशेष.
मोठी मेहनत : दोनदिवस एका रात्रीत सजावट पूर्ण होते. एका सजावटीत ३०० किलो शेवंती, १५० किलो झेंडू, १०० किलो आष्टर साधारण पाच किलो रंग लागतो. ही फुले गदग आणि बंगळुरू येथून आणावी लागतात.

ही तर सेवा
आमचाफुलांचा व्यवसाय आहे. एक सेवाभाव म्हणून हे काम आमच्याकडून केले जाते. देवाची सेवा घडते.१९९७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यमहोत्सवी वर्षानिमित्त योगसमाधीला तिरंगा सजावट करण्यात आली होती.” मंजूनाथतेलसंग, सजावटीचे मानकरी