आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कप्पडकळीने झाली धार्मिक विधींची सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवतश्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाचा योगदंड पूजन विधी कप्पडकळी म्हणजे वस्त्रविसर्जन हे दोन्ही विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दुपारी साडेबाराच्या सुमारास सिद्धेश्वरांच्या योगदंडासह पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, जगदीश, विकास, मनोज हिरेहब्बू शुक्रवार पेठेतीलdi देशमुख वाड्यात आले. येथे योगदंडाची विधिवत प्रतिष्ठापना करीत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला. याप्रसंगी देशमुख कुटुंबातील सोमशंकर देशमुख, सुदेश, राजशेखर, सुधीर, सौ. शीलाताई, संगीता, क्षमा शिल्पा आदींनी योगदंडाची आरती केली. नंतर पुन्हा पूजेने योगदंड बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आला. रात्रीच्या ११ वाजलेपासून बाळीवेस श्री मल्लिकार्जुन मंदिरात मानाच्या नंदीध्वजांचा कप्पडकळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मानकरी हिरेहब्बू यांनी भगवी वस्त्रे मानाच्या पहिल्या दुसऱ्या नंदीध्वजाचा साज काढीत पूजन करण्यात आले. १२ वाजण्याच्या सुमारास हा विधी पूर्ण झाला. यानंतर पुन्हा पूजा करून नंदीध्वज मंदिरात ठेवण्यात आले.