आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिराची लिंक पाहिली १४२ देशांतून १२ लाखांनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावर दिवाळीत करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी जगभरातील १४२ देशांतील १२ लाख जणांनी पाहिली. याचे संकेतस्थळ भवानी पेठेत वास्तव्यास असणाऱ्या अमित कलशेट्टी यांने केली आहे. गुगल अॅनेलिटिक्स संकेतस्थळावर अधिकृत दर्शन विवरण उपलब्ध आहे. सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेवर आधारित ब्रँडिंग संकल्पना आहे. त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. यामुळे लोकल टू ग्लोबल ग्रामदैवताचा झेंडा रोवला गेला आहे.

अमित यांनी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदविका घेतली आहे. ते साॅफ्टवेअर संगणकीय कामे करतात. दिव्य मराठीची सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पना जागतिक स्तरावर लिंकच्या माध्यमातून जगासमोर यावी हा उद्देश होता. त्यांनी या लिंकच्या माध्यमातून सिद्धेश्वर मंदिरावर करण्यात आलेल्या एलईडी लायटिंगचा फोटो वापरला आहे. दिवाळीच्या कालावधीत सिद्धेश्वर मंदिरावर फटाके उडताना कसे दिसतात? शिवाय हा परिसर किती रमणीय आहे? याचे थोडक्यात विवरण आहे.

काय आहे लिंक
www.basavsansthasolapur.org/divali/divali.html या नावाने ही लिंक तयार करण्यात आली. यात रात्रीच्या वेळी मंदिराचे प्रतिबिंब कसे दिसते ते चित्र होते. शिवाय मोबाइल स्क्रिनवर किंवा संगणकावर क्लिक केले की मंदिरावर आकाशात फटाके उडताना दिसत होते. ही लिंक भेट देणाऱ्यांना इतकी आवडली ती तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ क्लिक केल्याची नोंदी झाली आहे.

भारत - लाख ३८ हजार ५५
अमेरिका - लाख १० हजार ५९३
अरब अमिरात - हजार ९४३
थायलंड - हजार १८४
इंग्लंड - हजार ६५३
ओमान - हजार ३४४
तैवान - हजार २१८
सिंगापूर - हजार १७६

^गुगलच्या स्टॅटिस्टिकलअॅनेलिस्टिकलवर भेट देणाऱ्यांची ही आकेडवारी आहे. ही लिंक पाहून गौरीश (बंगळुरू) यांनी मंदिराला भेट दिली. वीरशैव व्हीजनचे राजशेखर बुरकुले आदींचे सहकार्य लाभले. पुढे ‘सुवर्ण सिद्धेश्वर’ला ग्लोबल करण्याचा मानस आहे.” अमित कलशेट्टी, लिंकनिर्माता
बातम्या आणखी आहेत...