आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर यात्रेसाठी पुन्हा आंदोलन, प्रशासनाविरुद्ध आता चक्री उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदासिद्धेश्वर यात्रेचा वाद शमता शमेना. यात्रेच्या वादावरून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. शनिवारपासून चक्री उपोषण करण्यात येणार आहे.

सिद्धेश्वर देवस्थान पंच समितीच्या कार्यालयात बैठक झाली. तीत दोन दिवस चक्री उपोषण आणि प्रश्न सुटला नाही तर सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. वादामुळे समितीने यंदा होम मैदानावर यात्रेतील दुकाने भरवणार नसल्याचे जाहीर केले. या निर्णयाच्या स्वागताच्या प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आिण पोलिस आयुक्त यांनी दिल्या. त्यावर कडाडून टीका झाली.
भाविकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी होम मैदानावर मॅट टाकणे आणि संकटकाळासाठी रस्ता मोकळा सोडणे या दोन प्रमुख मुद्द्यांसह २८ सूचना यात्रेसाठी प्रशासनाने केल्या होत्या. त्या नाकारून शहर बंद रास्ता रोको आंदोलनही केले होते.

समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले की, पोलिस अायुक्त अाणि महापालिका अायुक्त दबावाखाली असल्याने निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, सहकारमंत्री यांनीही समितीच्या बाजूने बोलले. मात्र, तरीही प्रशासन ऐकत नाही. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घेत आहोत.
या वेळी माजी अामदार शिवशरण पाटील-बिराजदार, अॅड. मिलिंद थोबडे, नगरसेवक जगदीश पाटील, सिध्दय्या स्वामी, राजशेखर हिरेहब्बू, बसवराज भीमदे, कुमार शिरसी, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, श्रीशैल शेटे, गुंडप्पा कारभारी, रामकृष्ण नष्टे, तम्मा गंभीरे, सोमशंकर देशमुख, चिदानंद वनारोटे, मल्लिकार्जुन वाकळे, काशिनाथ दर्गोपाटील, मल्लेश कावळे, राजशेखर चडचणकर, तम्मा मसरे, अनिल सिंदगी, मनोज हिरेहब्बू, राजू हौशेट्टी, सकलेश बाभूळगावकर, राजशेखर देशमुख, सोमनाथ मेंगाणे अादी उपस्थित होते.

अाता जगदीश पाटलांकडे नेतृत्व
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ शनिवारी मुंबईला जाणार होते. ही भेट पुढे ढकलण्यात अाली अाहे. वादात समितीचे नेतृत्व पालकमंत्री विजय देशमुख यांच्याकडे होते. यात्रा भरवण्याच्या निर्णयानंतर त्यांनी अंग काढून घेतले आहे. त्यामुळे नेतृत्व पाटील यांच्याकडे आले आहे.

चिथावणीखोर भाषा
^निषेध म्हणून समितीने यात्रा भरवणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी स्वागत अभिनंदन करून जिल्हाधिकारी अाणि पोलिस अायुक्त यांनी सिद्धेश्वर भक्तांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. देवस्थानची परंपरा अाणि हक्क कायम ठेवण्यासाठी प्रसंगी आम्ही अाडवे पडू.” धर्मराज काडादी, अध्यक्ष,देवस्थान पंच समिती