आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजनाचे साहित्य होम मैदानावरच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील विवादास्पद आपत्कालीन रस्त्यावरून देवस्थान समिती आणि प्रशासनाचा सव्वा महिन्याचा कालावधी संघर्षात गेला. शनिवारी सायंकाळपर्यंत तरी पाळणे आणि मनोरंजनाचे साहित्य थाटण्याचे काम तो रस्ता मोकळा सोडून मैदानातच सुरू होते. दरम्यान पाळणे व्यावसायिकांना रस्ता क्षेत्राचा वापर करण्याची सूचना देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. मात्र, व्यावसायिकांनी असमर्थता दाखवली. पठाण बागेजवळ मंडप उभारताना पोलिसांकडून विरोध झाल्याने वादाचा प्रसंग निर्माण झाला.
शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पठाण बागेजवळ एका व्यावसायिकाने नव्या पर्यायी आपत्कालीन मार्गावर तो मंडप मारला, अशी शंका आल्याने पोलिसांनी त्या व्यावसायिकास हटकले. त्यावर त्याने लगेच मंदिर समितीच्या यात्रा कार्यालयात फोन लावला. त्वरित अध्यक्ष काडादी, विश्वस्त अॅड. आर. एस. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. हा वाद लगेच मिटला पण पठाण बागेजवळ आलेली पंचमंडळी तशीच होममैदानात गेली. त्यांनी मुंबई, वसई, अोरिसा, बंगाल आदी भागातून व्यवसायासाठी आलेल्यांना रस्त्यावर आपले मनोरंजन साहित्य उभे करावे, असे सांगितले. मात्र, जोडणी उभारणीस वेळ लागत असल्याने यंदा पाळणे मैदानावरच उभारणार असे व्यावसायिकांनी सांगितले.

 साने गुरुजी कथामाला पुरस्कार
स्थळ : फडकुले सभागृह वेळ : दुपारी
 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
स्थळ : वालचंद कॉलेज वेळ : स. ८.३०
 इलेक्ट्रो २०१६ प्रदर्शन
स्थळ : हरिभाई देवकरण प्रशाला प्रांगण वेळ : दु. ११ ते ९.३०

देवस्थानकडून शिंदे देशमुख यांचा सन्मान
यात्रेच्या वादावर योग्य मार्ग काढल्याबद्दल देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी पुष्कराज काडादी, संदेश भोगडे, प्रकाश बिराजदार, मल्लिनाथ जोडभावी अादी उपस्थित होते.

मंदिराच्या मूळ स्वरूपाला धक्का लागू नये
मंदिरात होत असलेल्या सुवर्ण सिद्धेश्वर उपक्रमांची माहिती देण्यासाठी बैठक घेतली. नव्या कामांमुळे ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मंदिरास काही इजा पोहोचू नये अशी सूचना मंदिराचे पुजारी हब्बू यांनी केली. यावर अध्यक्ष काडादी यांनीही मूळ वास्तूस धोका पोहोचवता सगळी कामे करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी पुजारी आनंद हब्बू यांच्यासह प्रशांत, शिवकुमार हब्बू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाळणे मैदानावरच
^पाळणे उभेकरण्यास दोनतीन दिवस लागतात, ते जबाबदारीचे काम आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळता येत नाही. आम्ही भांडणे करायला नाही तर व्यापारासाठी आलो आहोत आणि पुन्हा पाळणे तोडून जोडायला वेळ जातो, ते शक्य नाही. यंदा आम्ही आमचे पाळणे मैदानावरच ठेवणार आहोत.” मुन्नीभाई साहू, पाळणाब्रेकडान्स मालक