आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर तलावातील दुर्गंधी, जलप्रदूषणावर उपाययोजना सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुवर्ण सिद्धेश्वरसाठी शहरवासीयांसोबत आता जनसेवा हीच ईशसेवा असे ब्रीद असणाऱ्या महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधीही सकारात्मक झाले आहेत. वारंवार तलावात होणारे जलप्रदूषण, माशांचा मृत्यू दुर्गंधी यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील सर्वच ड्रेनेज लाइन बदलण्याचे काम सुरू झाले आहे.
नगरसेवक जगदीश पाटील यांनी पुढाकार घेत मंदिरातील सर्वच सांडपाण्याचे पाइपलाइन बदलण्याचा प्रस्ताव पालिकेत मांडत १० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेतला आहे. पाच ते सहा दिवसांत हे काम पूर्ण होईल. दासोहचे सांडपाणी, सुलभ शौचालय भक्तनिवास आदींचे सांडपाणी निचरा होताना गळती होत होती. यासाठी जलतरण तलाव ते सन्मत्ती कट्टा, कट्टा ते भक्त निवास, भक्त निवास ते लोखंडा प्रवेशद्वारमार्गे श्री अमृतलिंग ते दासोहची मागची बाजू असे पाइपलाइनचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी पालिकेचे अभियंते तर कार्यरत आहेत. सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता एन. पी. इंगळे यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

जानेवारीपूर्वी पूर्ण होतील कामे
^ग्रामदैवतश्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिर तसेच तलाव परिसरात पालिका निधीतून जी काही आवश्यक कामे आहेत, ती करण्याचा प्रयास आहे. मंदिर केवळ सोने-चांदीने मढवून चालणार नाही. कारण ते सुवर्ण सिद्धेश्वर झाल्यावर भाविकांचा जो ओढा वाढेल त्यावेळी भक्तनिवास, वाहनतळ, पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आदी कामे महत्त्वाची आहेत. त्यांची पूर्तता आधीच करण्याचा मानस आहे. जगदीश पाटील, नगरसेवक

बदललेली पाइप लाइन
इंचीच्या जागी १० १२ इंची लाइन
एकूण १५० मीटर पाइपलाइनचे काम
नव्याने १५ चेंबर्स ते फूट उंचीचे
एका पाइपची लांबी २.५ मीटरची
एनपी थ्री या अद्ययावत पाइपचा वापर

अशी होती अडचण
पूर्वीइंची लाइन होती. त्यामुळे मंदिरातील गटार कायम तुंबत होती. तसेच त्याचे पाणी तलावात जाऊन जलप्रदूषण व्हायचे. शिवाय मंदिर आणि तलाव हा भाग आजूबाजूच्या भूभागापेक्षा जवळपास १२ ते १५ फूट खाली आहे. येथे जर गटार तुंबण्याचे प्रसंग आले तर हाताने मार्ग मोकळा करणे अथवा आता उपलब्ध असलेल्या जेंटिंग मशिनने मैला पाणी ओढून घेणे अशी कामे व्हायची. आता या नव्या कामामुळे पाइपना योग्य उतार दिशा देत विनाअडथळा निचऱ्यात सुलभपणा आणण्यात यश आले आहे.