आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री सिद्धरामेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवतश्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचा शुभारंभ १२ जानेवारीपासून होत असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संस्कारभारती कला फाउंडेशनकडून जवळपास सर्वच नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या, पशू प्रदर्शन विक्री, कृषी प्रदर्शन, विद्युत रोषणाई, स्वयंरोजगार महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन, राज्यस्तरीय भजन स्पर्धा आदी कार्यक्रम असणार आहेत. 

काडादी पुढे म्हणाले, सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियानाचे काम २० टक्के काम पूर्ण झाले असून, यासाठी आवश्यक असणारे सोने चांदी मंदिर समितीकडे जमा झाले आहे. यात्रेनंतर गर्भगृहासमोर असणारा लोखंडी सभामंडप काढून तेथे वन टू नेचर प्रकल्पांतर्गत दगडी सभामंडप उभारण्यात येणार आहे. शिखराच्या सुवर्णकामासाठी चायना कॉन्सुलेट कंपनीशी बोलणे झाले असून, यात्रेनंतर त्याचेही काम सुरू होणार आहे. 

अपघात विमा योजना 
यंदाच्याग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचे विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच उपस्थित सर्वच भाविकांचा संयुक्तिक विमा उतरवण्यात आला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे पब्लिक लायब्ल्टी इन्शुरन्स उतवण्यात आला आहे. याचा ३० हजार रुपये प्रीमियम भरला असून, कोटी रुपयांची जीवित वित्तहानीसंदर्भात नुकसानभरपाई मिळणार आहे. 

११ फुटी बैलाचे आकर्षण 
होममैदानावर असणाऱ्या कृषी प्रदर्शनात यंदा २२० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. ११ फूट लांबीचा जातिवंत बैल या प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळणार आहे. तसेच यात एक वेगळ्या पद्धतीचा डॉग शो असणार आहे. तसेच वैविध्यपूर्ण औजारे, कृषी साहित्य, आधुनिक तंत्र पद्धतीचे साहित्य प्रदर्शनास विक्रीस असणार आहे. 

‘यशोधरा’कडून आरोग्य सेवा 
यंदाच्या यात्रेत यशोधरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडून यात्राकाळात पूर्णवेळ मोफत रुग्णवाहिका आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे. या विव िध वैद्यकीय सेवांचा समावेश असून, होम मैदानावर याचा एक तंबू उभारण्यात येणार आहे.