आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षपूर्ती: कोपर्डीच्या घटनेचा मौन निषेध, श्रद्धांजलीस शेकडोंची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकल मराठा समाजच्या वतीने कोपर्डीतील निर्भयास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास चार पुतळा येथे गुरुवारी सायंकाळी उपस्थित समुदाय. - Divya Marathi
सकल मराठा समाजच्या वतीने कोपर्डीतील निर्भयास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास चार पुतळा येथे गुरुवारी सायंकाळी उपस्थित समुदाय.
सोलापूर- शांत नजरांनी कोपर्डीच्या निर्भयाला सोलापूरच्या सकल मराठा समाजाने आणि शहरवासीयांनी चार हुतात्म्यांना साक्षी ठेवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात कळत तरळणारे अश्रू अन् आता तरी न्याय द्या, अशा भावना होत्या. 

कोपर्डीत मुलीवर अत्याचार घडलेल्या घटनेला एक वर्ष लोटले तरी अजूनही गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही. खटला पुढे सरकला नाही. युवती, महिला कोणत्याही समाजाच्या का असेना मात्र त्यांना न्याय वेळेवर मिळणे गरजेचे आहे, अशी भावना या सभेतून व्यक्त झाली. 

विद्यार्थी, युवक, युवती, महिला, वृद्ध अनेकांनी आपल्या भावना एक शब्दही बोलता व्यक्त केल्या. सुमारे हजार नागरिकांनी यावेळी उपस्थिती लावली. प्रथम अकरा मान्यवर विविध समाज, क्षेत्रातील महिलांनी मंचावर येऊन श्रद्धांजली वाहिली. त्यात महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेवक फिरदोस पटेल, मराठा समाजाच्या ज्येष्ठ कार्यकत्या सुमन जाधव, आरती वाबगावकर, जैन समाजाच्या नेत्या हेमलता वेद, धनगर समाजाच्या शोभा पाटील, मंगला कांबळे, उद्योग वर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण, कामिनी गांधी, अक्कनबळग संस्थेच्या अध्यक्षा शोभा गंगनहळळी, शैक्षणिक क्षेत्रातील सुनीता कोळी यांचा समावेश होता. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, हरिभाऊ चौगुले, नगरसेवक अमोल शिंदे, तर नलिनी जगताप, उत्तरा बरडे, वैशाली जाधव, शुभांगी बुवा, दीपा सुरवसे, जीवन ज्योती क्रीडा कला प्रसारक मंडळ शाळेच्या विद्यार्थिनी, ‘व्हीव्हीपी’च्या विद्यार्थिनी, विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. 

पक्ष्यांचाच किलबिलाट 
काहीगोंधळ नाही, ना घोषणा ना साऊंडचा आवाज होता. केवळ पेटलेल्या मेणबत्त्या होत्या. सायंकाळ होत आल्याने पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. 

चिमुकलींचाही होता सहभाग 
अनिषा जाधव, शिवानी मुळे, सुहासिनी जगताप, मुक्ताई धाराशिवकर या चौघींनी सभेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तर काळ्या रंगाच्या वेषातील सकल मराठा समाजाच्या तरुण-तरुणांनी श्रद्धांजली सभेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या सभेत त्यांचीही संख्या मोठी होती. 

महिलांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया 
दीपा सुरवसे :
आता तरी वेगाने केसचे काम केले पाहिजे. आता उशीर नको. 
उत्तरा बरडे :जलद न्यायालयात घेऊन लवकर निकाल द्यावा. अन्याय सहन होत नाही. 
चंद्रिका चव्हाण :लवकर न्याय दिल्याने इतरांना चोप बसेल. दुसरे हात धजावणार नाहीत. 
नलिनी जगताप : वेळनको. राज्य सरकारने ही केस विशेष न्यायालयात देऊन न्याय द्यावा. 
वैशाली जाधव : इतरनराधमांना चेतावणी देण्यासाठी न्याय योग्य वेळेवर होणे गरजेचे. 
बातम्या आणखी आहेत...