आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरची सिंधू - वयाच्या आठव्या वर्षापासून हातात टेनिस रॅकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेने जिद्दीच्या जोरावर सानिया मिर्झाच्या साथीने आॅलिम्पिकमध्ये धडक मारत महिला दुहेरीमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले. आॅलिम्पिकमध्ये चिवट झुंज दिल्यानंतरही दुर्दैवाने अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु भारताचे नांव जगात रोषण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून असलेल्या प्रार्थनाने अधिक उमेदीने ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यामुळे सोलापूरची सिंधू म्हणून तिच्याकडे क्रीडाप्रेमी पहात आहेत.


आजोबा (कै.)अप्पासाहेब झाडबुके यांना टेनिस खेळण्याचा छंद. प्रार्थनाही ते पहात असे. यातूनच तिला टेनिसची आवड निर्माण झाली. मग वयाच्या आठव्या वर्षी तिनेही टेनिसचे रॅकेट हातात उचलले. वेळप्रसंगी तिने गोडावूनमधील भिंतीवरही सराव केला. दहाव्या वर्षी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात सुवर्ण पटकावले. तेथून तिने मागे वळून पाहिले नाही. ज्युनियर गटात १३ व्या वर्षी भारताचे प्रतिनिधीत्व केले. १४ व्या वर्षी आॅस्टेलियन ग्रँड स्लॅम खेळली. १६ व्या वर्षी फेडकपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. फेडकपमध्येच तिची सानिया मिर्झाशी भेट झाली.


फेडकपमध्ये सानिया मिर्झाला प्रार्थनाच्या खेळाची चुणूक दिसून आली. सानिया मिर्झा प्रार्थना या जोडीने आशियाई स्पर्धेत ब्रॉंझची कमाई केली. १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गुवाहाटी येथे महिला दुहेरीत शर्मला बालूच्या सोबतीने सुवर्ण पटकाविले. सध्या ती हैदराबाद येथील सानिया मिर्झा टेनिस अकादमीत सराव करत आहे. जिद्दीच्या बळावर तिने हे यशोशिखर गाठले आहे. तिच्या या वाटचालीत तिला आजी प्रभाताई, वडील गुलाबराव, तसेच आई वर्षा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.


पुढचे ध्येय ग्रॅण्डस्लॅम खेळणे : प्रार्थना ठोंबरे
स्पर्धा जवळ आल्यावर खेळाडूंना प्रोत्साहनपर मदत दिली जाते परंतु अशी मदत, मार्गदर्शन सातत्यपूर्ण असली पाहिजे. तसे झाल्यास मोठ्या प्रमाणावर खेळाडू चमकू शकतील. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा खेळणे हे माझे पुढचे लक्ष्य असून त्या दृष्टिकोनातून सराव सुरू आहे.


आयटीएफ विजेती : एकेरी ३, दुहेरी १७
सर्वोच्च मानांकन : एकेरी ३३५ (ऑगस्ट २०१४), दुहेरी २०८ (मे २०१६)
सध्याचे मानांकन : एकेरी ४७१, दुहेरी २१०
बातम्या आणखी आहेत...