आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोले गावाच्या सरपंचपदी प्रियंका आसबे तर उपसरपंचपदी पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - अकोले(मंद्रूप) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रियंका रमेश आसबे तर उपसरपंचपदी हणमंत पवार यांची अविरोध निवड झाली. रमेश अासबे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व सात जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी प्रियंका आसबे तर उपसरपंचपदासाठी पवार यांचा प्रत्येकी एकच अर्ज आला. त्यामुळे दोन्ही पदाची निवड अविरोध झाली.
या वेळी नूतन सदस्य कमलाकर पाटील, शरद कांबळे, छाया जाधव, मालती जाधव, ललिता माने तसेच दादासाहेब पाटील, अरुण माने, रमेश आसबे, िबरू पाटील, गोटू पाटील, दादा जाधव, शंकर माने, अमृत पाटील उपस्थित होते.

गावच्या सरपंचपदासाठी वाटेल ते करण्याच्या घटना आपण पाहतो. पण याला छेद देण्याचा प्रकार अंत्राेळीत घडला आहे. ४० वर्षे अंत्रोळीकर घराण्याकडे गावची सत्ता होती. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अंत्रोळीकरांना बहुमत मिळाले नाही. मात्र त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत विरोधी सदस्यांनी सरपंच होण्याची विनंती केली. मात्र त्यास नम्रपणे नकार देत आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी राजकारण्यांना आदर्श घालून दिला आहे.

नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रवींद्र थोरात तर उपसरपंचपदी गिरिजा पाटील यांची अविरोध निवड झाली. येथे आनंद अंत्रोळीकर गजिनाथ शेजाळ यांच्या पॅनलमध्ये निवडणूक झाली. शेजाळ गटाने पाच जागा जिंकून बहुमत मिळवले. तर अंत्रोळीकरांना चार जागा मिळाल्या. सरपंच निवडीवरून शेजाळ थोरात गटात एकमत होत नव्हते. त्यामुळे सत्ता मिळवूनही विरोधकांनी अंत्रोळीकरांना सरपंच होण्याची विनंती केली. दादासाहेब थोरात, नाना करपे, नूतन सरपंच रवींद्र थोरात आदींनी अंत्रोळीकर कुटुंबातील आनंद यांनीच सरपंच व्हावे असा आग्रह धरला. मात्र जनतेने नाकारल्याने त्यांनी नम्रपणे सरपंच होण्यास नकार दिला. सत्ता मिळवूनही सरपंचासाठी एकमत होत नसल्याने अखेर माजी आमदार दिलीप माने समर्थक अंत्रोळीकर शिवसेनेचे गणेश वानकर समर्थक थोरात गटाने एकत्र येत सरपंच उपसरपंचपदाची अविरोध निवड केली.

नाकारल्यामुळे निर्णय
Ãग्रामस्थांनीवडील नानासाहेबांना ३५ वर्षे, आई मीनाक्षीला वर्षे सरपंच केले. ४० वर्षे आमच्या घरात सरपंचपद होते. या वेळी जनतेने नाकारले. मात्र ज्यांनी विजय मिळवला. ते मला सरपंच करण्यासाठी आग्रही होते. मी नम्रपणे नाकारले. आनंदकुमार अंत्रोळीकर, ज्येष्ठ नेते.

अंत्रोळीकरांचे मार्गदर्शन घेऊ
Ãअंत्रोळीकरांनीसरपंच व्हावे असा आम्हा सर्वांचा आग्रह होता. पण त्यांनी नकार दिला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावाचा विकास करू. जितेंद्रथोरात, नूतन सरपंच, अंत्रोळी

सत्ता मिळवूनही शेजाळ एकाकी
या निवडणुकीत गजिनाथ शेजाळ यांच्या पॅनलने पाच जागा जिंकून सत्ता मिळवली. मात्र त्यांना सरपंच निवडीवेळी माघार घ्यावी लागली. सरपंच उपसरपंच या दोन्ही पदासाठी शेजाळ यांनी अर्ज भरला. मात्र त्यांचे समर्थक सदस्य अंत्रोळीकर गटाला जाऊन मिळाल्याने त्यांच्या अंगावरचा विजयी गुलाल सरपंच निवडीवेळी दिसला नाही. विशेष म्हणजे सरपंचपदाच्या निवडीच्या सभेला ते अनुपस्थित राहिले.