आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी देऊन फुलवला भावाचा संसार; राखी पोर्णिमेला बहिणीची भावाला ओवाळणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राखी पौर्णिमा म्हटले की बहीण भावाला राखी बांधते. भाऊ बहिणीला ओवाळणीत साडी, पैसे अथवा ड्रेस आदी भेटवस्तू देतात. परंतु बहिणीने लहानपणापासून भावाकडून विविध भेटवस्तू घेतल्या, त्या भेटवस्तूंपेक्षा मौल्यवान अशी भेट स्वत:ची मूत्रपिंड (किडनी) देऊन भावाचा मोडणारा संसार वाचवला आहे. बहिणीकडून मूत्रपिंड घेणाऱ्या भावाचे नाव आहे प्रभू राम शिंपले. 
  
उस्मानाबाद गावसूद येथील सुनंदा तुकाराम गायकवाड असे मूत्रपिंड दान करणाऱ्या बहिणीचे  नाव आहे. प्रभूच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्याला डायलिसिस करावे लागत होते. त्यावर एकच पर्याय होता, मूत्रपिंड बदलणे. त्यावर पत्नीने किडनी देण्याची तयारी दर्शवली, परंतु ती मॅच झाली नाही. छोट्या बहिणीनेही तयारी दर्शवली होती; परंतु बहिणीला मधुमेह होता, त्यामुळे तिला किडनी देता आली नाही.  शेवटी मोठी बहीण सुनंदा गायकवाड हिची किडनी जुळली. त्यामुळे विविध प्रकारच्या तपासण्या करून १ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. संदीप होळकर यांनी केली.

वाढदिवशीच मिळाला पुनर्जन्म  
एक जून हा माझा वाढदिवस आहे. गेल्या वर्षी एक तारखेला किडनीच्या आजाराने त्रस्त होताे. १ जून २०१७ रोजी माझ्या बहिणीने किडनी देऊन मला पुन्हा जन्माला घातले. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने आयुष्य संपते की काय, असे वाटत होते, परंतु किडनी मिळाल्याने  पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करतोय, असे सनुंदा यांचे प्रभू शिंपले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...